ETV Bharat / state

होळीच्या सणाला रेल्वेची खास सेवा: मध्य रेल्वे चालवणार 112 विशेष ट्रेन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 8:14 AM IST

Special Train For Holi Festival : होळीच्या सणाला मध्य रेल्वेच्या वतीनं 112 विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बनारस या दरम्यान या विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

Special Train For Holi Festival
संग्रहित छायाचित्र

मुंबई Special Train For Holi Festival : होळी सण तोंडावर आलेला असून होळीसाठी इतर राज्यातील कामगार आपल्या घरी परत जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनानं होळीच्या निमित्त विशेष अतिरिक्त 112 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बनारस विशेष फेऱ्या : मुंबईहून उत्तर प्रदेशातील बनारस इथं जाणाऱ्या गाड्यांसाठी सहा विशेष फेऱ्यांचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये 13 मार्च 2024 ते 20 मार्च 2024 आणि 27 मार्च 2024 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसपासून सव्वा बारा वाजता विशेष ट्रेन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बनारस उत्तर प्रदेश या ठिकाणी 16 वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल.

मुंबई ते बनारस दरम्यान सहा विशेष रेल्वे : 14 मार्च 2024 आणि 21 मार्च 2024 तसेच 28 मार्च 2024 रोजी उत्तर प्रदेशातील बनारस रेल्वे स्थानक इथून 20 वाजून 30 मिनिटांनी विशेष ट्रेन सुटेल आणि मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी 23 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. म्हणजे बनारस येथून तीन फेऱ्या मुंबईसाठी आणि मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बनारस करता तीन अशा एकूण सहा विशेष फेऱ्या होतील.

या थांब्यावर थांबतील विशेष ट्रेन : या विशेष रेल्वे फेऱ्यांमध्ये रेल्वेचे थांबे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मेहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज चिक्की या ठिकाणी रेल्वे थांबेल.

मुंबई ते दानापूर साप्ताहिक अति जलद विशेष ट्रेन : 23 मार्च 2024 आणि 25 मार्च 2024 तसेच 30 मार्च 2024 आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सव्वा बारा वाजता दानापूर इथं जाण्यासाठी विशेष रेल्वे निघणार आहे. ती रेल्वे दुसऱ्या दिवशी 17 वाजता तिथं पोहोचेल. तर 24 मार्च 2024 आणि 26 मार्च 2024 तसेच 31 मार्च 2024 रोजी दानापूर या रेल्वे स्थानकातून सायंकाळी 18 वाजून 15 मिनिटांनी विशेष ट्रेन सुटेल, ती ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथं दुसऱ्या दिवशी 23 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी कळवली आहे.

हेही वाचा :

  1. कहरच! चक्क ड्रायव्हरविना धावली रेल्वे गाडी, कठुआ रेल्वे स्थानकातील प्रकार
  2. Womens Day 2024 : महिलांनी चालवली मालगाडी; लोको पायलट ते गार्ड सर्व महिलाच
  3. जामतारा येथे रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.