ETV Bharat / entertainment

बॉलिवूड पदार्पणाच्या 'महाराजा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी जुनैद खानच्या 'एक दिन' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण - Junaid Khan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 7:14 PM IST

सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि अभिनेत्री साई पल्लवी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. जुनैदच्या सिनेपदार्पणाच्या 'महाराजा' चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू असतानाचा त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय. 'एक दिन' असं शीर्षक असलेला हा चित्रपट साई पल्लवीच्या बॉलिवूड पदार्पणाचा महत्त्वकांक्षी चित्रपट असल्याचं मानलं जातं.

The shooting of Junaid Khans Ek Din has been completed
जुनैद खानच्या 'एक दिन' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने अजून 'महाराजा' या चित्रपटातून पदार्पण केलेलं नाही. त्याचा पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच जुनैदनं त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. या चित्रपटाचं शीर्षक 'एक दिन' असं आहे. या आगामी चित्रपटात जुनैद अभिनेत्री सई पल्लवीबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. नुकतेच त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जुनैद खाननं त्याच्या दुसऱ्या चित्रपटासाठी 58 दिवसांचं शूटिंग पूर्ण केलं आहे. साई पल्लवीच्या फॅन पेजेसवर शेअर केलेली अनेक फोटोदेखील त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या बातमीला दुजोरा देत आहेत.

चित्रपटाविषयीचे तपशील अद्याप गुलदस्त्यात असले तरी, शूटिंग सेटवरील लोक जुनैद खानच्या अभिनयाची प्रशंसा करत आहेत, त्याचं व्यक्तीमत्त्व अष्टपैलू असल्याचं आणि तो कामसाठी वडिलांप्रमाणेच समर्पित असल्याचं त्यांच्याकडून समजतं.

यापूर्वी जुनैद खान आणि साई पल्लवीनं चित्रपटासाठी जपानमध्ये 50 दिवस शूटिंग केलं होतं. जपानच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सप्पोरो स्नो फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या शूटिंगदरम्यान टिपलेले निसर्गरम्य सौंदर्य प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट ठरणार आहे. त्यानंतर या दोघांच्या शूटिंगमधील क्लिप्स फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याच्या चालू असलेल्या चित्रपटाव्यतिरिक्त, जुनैद खान आगामी महिन्यांत चित्रीकरण सुरू करणार असलेल्या लव्ह टुडेच्या हिंदी रिमेकमध्ये खुशी कपूरबरोबर काम करण्यासाठीची तयारी करत आहे.

नेटफ्लिक्सवर जुनैदच्या 'महाराजा' या पहिल्या चित्रपटाची प्रतीक्षा सुरू आहे. या ओटीटी जायंटने 2024 च्या स्लेटमध्ये 'महाराजा'चा समावेश केला होता, मात्र, रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. 'महाराजा'मधील त्यांच्या भूमिकेबद्दलचे तपशील गुप्त ठेवलेले असताना, विपुल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी लिहिलेल्या या चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी आहे. 'महाराजा' या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. मसाबानं गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर आजी नीना गुप्ताचा आनंद गगनात मावेना - Masaba announces pregnancy
  2. ईडीने ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर राज कुंद्राची गूढ पोस्ट - Raj Kundra
  3. 'अमर सिंग चमकीला'च्या शूटिंगमध्ये परिणीतीला लाईव्ह परफॉर्म करताना पाहून पती राघव चड्ढा झाला होता दंग - Parineeti Chopra
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.