ETV Bharat / entertainment

सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर रणदीप हुड्डानं शेअर केली पोस्ट - randeep hooda

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 11:59 AM IST

Randeep Hooda : सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याला एका अज्ञात व्यक्तीनं गोळ्या घालून ठार केल्यानंतर रणदीप हुड्डा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं अज्ञात व्यक्तीचे आभार मानले आहेत.

Randeep Hooda
रणदीप हुड्डा

मुंबई -Randeep Hooda : अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराजची लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. दरम्यान आयएसआयच्या सूचनेवरून अमीर सरफराजनं पाकिस्तानमध्ये कैदेत असलेल्या सरबजीत या भारतीय नागरिकाची हत्या केली होती. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात अमीरनं सरबजीतचा पॉलिथिननं गळा आवळून आणि मारहाण करून हत्या केली होती. पंजाबच्या सरबजीतला पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानी सैन्यानं पकडलं होतं. आता 'सरबजीत' चित्रपटात सरबजीतची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुड्डानं याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

Randeep Hooda
रणदीप हुड्डा

सरबजीतचा मारेकऱ्याचा मृत्यू : 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'सरबजीत' चित्रपटात सरबजीतनं पाकिस्तानच्या तुरुंगात आपले दिवस कसे घालवले आणि त्याचा कसा छळ झाला हे दाखवण्यात आलं होतं. सरबजीतची पाकिस्तानमधील तुरुंगात 2013 मध्ये हत्या करण्यात आली होती. आता सरबजीतच्या मारेकऱ्याच्या मृत्यूवर रणदीप हुड्डा म्हटलंय की, "सरबजीतवर चित्रपट करत असताना मला एक गोष्ट नेहमीच खटकत होती की, जेव्हा त्याला भारतात सोपवण्याची आणि त्याच्या कुटुंबीयांकडे परत आणण्याची चर्चा होत होती, तेव्हा त्याच्या मारेकऱ्याला तुरुंगात डांबण्यात का आलं होतं." दरम्यान तो लवकरच सरबजीतच्या मुलींना फोन करून त्यांच्याशी बोलणार असल्याचं त्यानं सांगितलं. याशिवाय त्यानं अमीर सरफराजला ज्यानं मारले, त्या अज्ञात व्यक्तींचे आभार मानले आहेत.

रणदीप हुड्डा करणार 'सरबजीत'च्या घरी कॉल : 'सरबजीत' चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं होतं. सरबजीतला 1991 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानं पाकिस्तानमधील तुरुंगात 22 वर्षे घालवली. हा चित्रपट खूप भावनिक असून या चित्रपटाची खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटात ऐश्वर्या राय, रिचा चढ्ढा आणि दर्शन कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. आज खरा न्याय सरबजीतला मिळाला आहे. त्याच्या मारेकऱ्याची मृत्यू झाल्यानंतर अनेकजण भारतातमध्ये खुश आहेत. दरम्यान रणदीप हा सरबजीतची बहीण दलबीर कौरच्या अंत्यसंस्कारातही सहभागी झाला होता. सरबजीतच्या बहिणीचं निधन 2022 मध्ये झालं होतं. दरम्यान रणदीपच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटामध्ये दिसला होता.

हेही वाचा :

  1. "मैदान पाहणं चुकवू नका" म्हणत, सौरव गांगुलीनं केलं अजय देवगणचा चित्रपट पाहण्याचं आवाहन - Ajay Devgn starrer Maidan
  2. आलिया भट्टनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त शेअर केला पती रणबीर कपूरबरोबरचा फोटो, पाहा पोस्ट - ALIA RANBIR WEDDING ANNIVERSARY
  3. इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्या नात्याबद्दल झाला खुलासा, वाचा सविस्तर - Palak and Ibrahim Dating
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.