ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्राचे फॅमिली व्हेकेशनमधील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल, पाहा पोस्ट - Priyanka Chopra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 4:03 PM IST

Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियांका चोप्रानं पुन्हा एकदा तिच्या फॅमिली व्हेकेशनमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका आपल्या कुटुंबाबरोबर मस्ती करताना दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा (प्रियंका चोपड़ा(Priyanka Chopra - Instagram))

मुंबई- Priyanka Chopra : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रानं नुकतेच तिच्या 'हेड्स ऑफ स्टेट' या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. आता ती आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे. प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या कौटुंबिक सुट्टीवर गेली आहे आणि तिथून तिनं एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबाबरोबर दिसत आहे. फोटोमध्ये प्रियांका मुलगी मालती मेरीचा लाड करताना दिसत आहे. याशिवाय ती निक जोनासबरोबर एन्जॉय करत आहे. फोटोत निक जोनास ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. याशिवाय प्रियांकानं ब्लॅक आऊटफिटवर ब्लू जॅकेट घातलं आहे.

प्रियांका चोप्रानं शेअर केला फोटो : फोटोत प्रियांका ही आपल्या मुलीला खांद्यावर पकडून मस्ती करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रियांका चोप्रानं लिहिलं, "माझे देवदूत." याआधी, प्रियांका चोप्रानं आई मधू चोप्राबरोबरचा एक फोटो शेअर केला होता, हा फोटो या सुट्टीमधील आहे. प्रियांका अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर परदेशात जात असते. यापूर्वी 9 मे रोजी प्रियांका चोप्रानं तिच्या पोस्टमध्ये सांगितलं होतं, की तिनं जॉन सीना स्टारर चित्रपट 'हेड्स ऑफ स्टेट'चे शूटिंग पूर्ण केलं आहे. या पोस्टमध्ये, तिनं फोटो आणि व्हिडिओंचा एक कोलाज शेअर केला होता, ज्यामध्ये प्रियांका तिची मुलगी मालतीबरोबर शूटिंग सेटवर मजा करताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला होता.

प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट : दरम्यान प्रियांकाच्या आगामी चित्रपटामध्ये सांगायचं झालं तर ती शेवटी 'द व्हाइट टाइगर' या चित्रपटामध्ये राजकुमार रावबरोबर दिसली होती. तिचा हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता. आता पुढं ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, मात्र सध्या या चित्रपटाबाबत कुठलेही अपडेट आलेली नाही. याशिवाय प्रियांका ही 'कल्पना चावला बायोपिक' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. गरोदरपणाच्या पुस्तकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्यानंतर उच्च न्यायालयानं करीना कपूरला बजावली नोटीस - kareena kapoor khan
  2. 'सरफरोश'ला 25 वर्षे पूर्ण, आमिर खाननं स्क्रिनिंगदरम्यान 'सरफरोश 2'ची केली घोषणा - aamir khan
  3. राजकुमार राव अभिनीत 'श्रीकांत' केली पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - rajkummar rao
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.