ETV Bharat / entertainment

मनोज बाजपेयी अभिनीत 'भैय्या जी'चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 5:29 PM IST

Bhaiyya Ji Teaser out: अभिनेता मनोज बाजपेयी स्टारर 'भैय्या जी' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये तो धमाकेदार दिसत आहे.

Bhaiyya Ji Teaser out
भैय्या जीचं टीझर रिलीज

मुंबई - Bhaiyya Ji Teaser out: 'सिर्फ एक आदमी काफी है' नंतर मनोज बाजपेयी पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. मनोज बाजपेयीचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'भैय्या जी'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही सेंकदाच्या या टीझरमध्ये मनोज बाजपेयीनं काहीही न बोलता जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. हा टीझर 2.13 सेंकदांचा आहे. आता सोशल मीडियावर मनोज बाजपेयीच्या अभिनयाचे अनेकजण कौतुक करत आहेत. 'भैय्या जी'मधील मनोज बाजपेयीच्या फर्स्ट लूकनं देखील सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'भैया जी' चित्रपटाचा टीझर रिलीज : आता या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. 'भैया जी' हा मनोज बाजपेयीचा चित्रपटसृष्टीतील तीन दशकांच्या प्रवासातील 100 वा चित्रपट आहे. दरम्यान प्रेक्षकांना 'भैया जी' चित्रपटातील मनोज बाजपेयी लूक हा खूप आवडला आहे. या टीझरच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, ''मनोज बाजपेयीचा अभिनय हा खूप खरा वाटतो, प्रत्येक पात्रामध्ये तो आपले 100 टक्के देत असतो.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''मनोज बाजपेयीचा हा चित्रपट ''गँग्ज ऑफ वासेपूर''ची आठवण करून देत आहे.'' आणखी एकानं लिहिलं, ''मला मनोज बाजपेयी यांचा लूक खूप जबरदस्त वाटला आहे.'' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण मनोज बाजपेयीला या चित्रपटासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

कसा आहे 'भैया जी'चा टीझर : मनोज बाजपेयी या चित्रपटाच्या टीझरमध्ये 'भैया जी'च्या पात्रामध्ये दहशत दाखवताना दिसत आहे. 'भैय्या जी'च्या टीझरमध्ये एक दमदार डायलॉगही आहे. या डायलॉगमध्ये मनोजनं म्हटलं, ''विनंती नाही नरसंहार होणार.'' गळ्यात टॉवेल आणि तोंडात सिगारेट असलेला मनोज बाजपेयीचा हा लूक सर्वांना धक्क करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केलंय. मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, ''हा चित्रपट यावर्षी 24 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.'' याआधी मनोज बाजपेयी शेवटी 'किलर सूप' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. या वेब सीरीजमध्ये त्याच्याबरोबर कोंकणा सेन देखील होती.

हेही वाचा :

  1. Priyanka Chopra Visit ayodhya : देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीबरोबर अयोध्येत ; व्हिडिओ व्हायरल
  2. Shahid and Vijay : शाहिद कपूरनं प्राइम व्हिडिओच्या इव्हेंटमध्ये विजय देवरकोंडाचा घेतला किस
  3. Pulkit Samrat and kriti kharbanda :'फुक्रे 3' फेम पुलकित आणि क्रितीनं मेहेंदी सेरेमनीचे फोटो केले शेअर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.