ETV Bharat / entertainment

पूनम पांडेच्या निधनावर कंगना रणौतने व्यक्त केला शोक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 2:33 PM IST

Poonam Pandey Death News : अभिनेत्री पूनम पांडेच्या अकाली निधनाची बातमी समजताच अभिनेत्री कंगन रणौतने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी, पूनमच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरील पोस्टच्या माध्यमातून तिचे सर्व्हायकल कॅन्सरने (Cervical Cancer Causes) निधनाची बातमी शेअर करण्यात आली होती.

Kangana Ranaut
कंगना रणौतने व्यक्त केला शोक

मुंबई - Poonam Pandey Death News : अभिनेत्री पूनम पांडेच्या अनपेक्षित निधनाच्या धक्कादायक बातमीनंतर कंगना रणौतने सोशल मीडियावर तिचं दु:ख व्यक्त केलं आहे. शुक्रवारी सकाळी सर्व्हायकल कॅन्सरमुळे (Cervical Cancer Causes) पूनमचे निधन झाल्याची बातमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली. नंतर पूनमच्या व्यवस्थापकानेही या दु:खद बातमीला दुजोरा दिला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीजवर कंगनाने पूनमच्या निधनाची बातमी शेअर केली आणि लिहिले, "हे खूप दुःखद आहे. एका तरुणीला कर्करोगाने गमावणे ही एक आपत्ती आहे." तिने तिच्या पोस्टचा शेवट "ओम शांती" या शब्दाने केला आहे.

'लॉक अप' या रिअ‍ॅलिटी शोच्या डेब्यू सीझनची कंगना रणौत होस्ट होती. या शोमध्ये पूनम पांडे स्पर्धक म्हणून सामील झाली होती. या शोने बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असलेल्या पूनमला तिची मानवी बाजू प्रेक्षकांसमोर दाखवण्याची संधी उपलब्ध दिली होती.

मॉडेल-अभिनेत्री असलेल्या कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर 32 व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी तिची व्यवस्थापक पारुल चावला यांनी तिच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.दरम्यान, पूनमच्या सोशल मीडिया हँडलवरील एका पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ""आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला कळवताना अत्यंत दुःख वाटत आहे की, सर्व्हायकल कॅन्सरने आमच्या पूनमला आमच्यापासून हिरावलं आहे. ती आमच्या स्मरणात राहील."

प्रसिद्ध झालेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पूनमच्या निधनाचा कोणताही तपशील, स्थान, वेळ किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची उपस्थिती याचा उल्लेख केलेला नाही. यामुळे अनेकजण या बातमीवर विश्वास ठेवलेला नाही. तर अनेकांनी ही बातमी समजताच सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरील संदेशात तिच्या निधनाबद्दलचे तपशील, स्थान, वेळ किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची उपस्थिती याबाबत तपशील दिलेला नाही.

पूनम पांडे बिग बॉस (2011) मध्ये दिसली होती. त्यानंतर तिने 2013 मध्ये 'नशा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती 'गलती सिर्फ तुम्हारी' (GST) आणि इतर अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येही दिसली होती.

हेही वाचा -

  1. अभिनेत्री पूनम पांडे्चं कॅन्सरमुळं निधन; इन्स्टाग्राम पोस्टमुळं चाहत्यांना धक्का
  2. करीना कपूरने 'द क्रू'च्या रिलीज तारखेसह शेअर केला आकर्षक टीझर
  3. करीना कपूरने '12th फेल' टीमला म्हटले 'लिजेंड्स', विक्रांत मॅसीची उत्सफूर्त प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.