ETV Bharat / entertainment

दिशा पटानीचा बॅकफ्लिप स्टंट पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या -पाहा व्हिडिओ - Disha Patani

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 5:37 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या निन्जा कौशल्याची झलक दिसत असून यामुळे चाहते प्रभावित झाले आहेत. तिचे प्रशिक्षक नदीम अख्तर यांच्याबरोबर ती बॅकफ्लिप स्टंट करताना दिसते.

Disha Patani Wows Fans
दिशा पटानीचा बॅकफ्लिप स्टंट

मुंबई - अभिनेत्री दिशा पटानीच्या चाहत्यांकडे तिच्यासाठी कौतुकाचा वर्षाव करण्याची अनेक कारणं आहेत. तिचं आकर्षक सौंदर्य, विलक्षण शरीरयष्टी आणि मार्शल आर्टची विशेष कौशल्ये ही तिची काही वैशिष्ट्ये आहेत. 31 वर्षीय अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या फिटनेसबाबत सतर्क असे आणि मेहनत करत असतानाचे व्हिडिओही शेअर करत असते. सोमवारी, दिशाने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिने निन्जा प्रशिक्षक नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅकफ्लिप स्टंट केल्याचं दिसत आहे.

दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती बॅकफ्लिप स्टंट करून तिचे निन्जा कौशल्य दाखवताना दिसत आहे. तिचा निन्जा प्रशिक्षक नदीम अख्तर तिच्या शेजारी आहे असून तिला स्टंट साकारण्यात मदत करताना दिसतो. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं 'ट्रेनिंग' असं लिहिलंय.

तिने पोस्ट टाकल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली आणि कौतुकाचाही वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले, "मॅम आप मेरा प्रेरणा हो." दुसऱ्याने लिहिले, "मेहनती गर्ल दिशा पटानी." एका नेटिझनने कमेंटमध्ये लहिलं, "तू अप्रतिम आहेस." आणखी एकाने लिहिले, "तू सर्वोत्तम आहेस."

तिच्या व्यावसायिक कामाच्या बाबतीत, दिशा पटानी शेवटची करण जोहरच्या 'योद्धा' या अ‍ॅक्शन चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्यासह , सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशि खन्ना सह-कलाकार होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी दिशाच्या भविष्यातील प्रकल्पामध्ये 'वेलकम टू द जंगल' आणि नाग अश्विनचा 'कल्की 2898 एडी' हे चित्रपट असून यामध्ये प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. शिवाय, 'कांगुवा' सोबत तमिळ चित्रपटसृष्टीतील तिचा उपक्रम एक चतुरसत्र अभिनेत्री म्हणून तिला ओळख निर्माण करुन देईल.

हेही वाचा -

  1. सोनू सूदच्या पाया पडली महिला चाहती, फोटो व्हायरल - Sonu Sood
  2. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजानं मुलांसह अयोध्येत घेतलं श्रीरामाचं दर्शन, फोटो व्हायरल - riteish and genelia visit ayodhya
  3. 'देवरा - भाग 1' च्या अंतिम शूटसाठी ज्युनियर एनटीआर सज्ज, पाहा कधी आहे शूटिंग - Jr NTR
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.