ETV Bharat / entertainment

'दंगल' गर्ल सुहानी भटनागरचे निधन, धाकट्या 'बबिता फोगट'ने अवघ्या 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 3:27 PM IST

Updated : Feb 17, 2024, 5:05 PM IST

अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले आहे. आमिर खान स्टारर 'दंगल' चित्रपटात तिनं बबिता फोगटची लहानपणीची भूमिका केली होती.

Suhani Bhatnagar passed away
सुहानी भटनागरचं निधन

मुंबई - 'दंगल' चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी मुलगी सुहानी भटनागरचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे. मृत्यूसमयी ती केवळ १९ वर्षांची होती. तिच्या संपूर्ण शरीरात द्रव साचले होते. काही काळापूर्वी सुहानीला अपघात झाला होता, यामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान तिने घेतलेल्या औषधांमुळे तिला रिअ‍ॅक्शन आली. यामुळे तिच्या शरीरात द्रव साचू लागले. तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सुहानी भटनागरच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. चाहते सुहानीच्या पडद्यावरील पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. ती हरियाणातील फरिदाबाद येथे राहात होती. तिच्या संपूर्ण शरीरात द्रव म्हणजेच पाणी साचले होते. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिच्या निधनामुळं सर्वांनाच दुःख झाले आहे. सुहानीवर आज शनिवारी फरीदाबादमधील अजरौंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुहानी भटनागरने आमिर खान स्टारर 'दंगल'मध्ये बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारली होती. चित्रपटातील 'बापू सेहत के लिए हनिकारक' है या गाण्यातील तिची स्क्रीन प्रेझेन्स खूप गाजली होती. या चित्रपटातील तिची भूमिका छोटी होती पण ती प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे. तिने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात मोठ्या बबिता फोगटची भूमिका सान्या मल्होत्राने साकारली होती.

'दंगल' चित्रपटानंतर सुहानीने अभिनयातून ब्रेक घेतला होता कारण तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होते. 'दंगल' हा 2016 चा चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट होता. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत आमिर खान आणि किरण राव यांनी केली होती. या चित्रपटात आमिरला महावीर सिंग फोगट या कुस्तीपटूच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते, जो आपल्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी यांना भारताच्या पहिल्या जागतिक दर्जाच्या महिला कुस्तीपटू बनण्यासाठी प्रशिक्षण देतो. फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी दोन फोगट बहिणींच्या भूमिका केल्या होत्या तर झायरा वसीम आणि सुहानी भटनागर यांनी लहानपणीच्या भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा -

  1. वडिलांच्या नावानं बांधलेल्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी रवीना टंडन झाली भावूक
  2. 'छावा'च्या शूटिंगमध्ये हात फ्रॅक्चरही होऊन विकी कौशलची जिद्द, म्हणाला "थांबू शकत नाही"
  3. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार
Last Updated : Feb 17, 2024, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.