ETV Bharat / entertainment

Bastar the naxal story : 'बस्तर-द नक्सल स्टोरी' स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दोनदा वीज खंडित झाल्यानं जेएनयूमध्ये गोंधळ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 11:07 AM IST

Bastar the naxal story : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 'बस्तर-द नक्सल स्टोरी'चं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रीनिंग सुरू असताना दोनदा वीज खंडित झाली. यानंतर विद्यापीठात एक गोंधळ निर्माण झाला होता.

Bastar the naxal story
'बस्तर-द नक्सल स्टोरी'

मुंबई - Bastar the naxal story : 'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर विपुल अमृतलाल शाह 'बस्तर-द नक्सल स्टोरी' चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपटही वास्तविक घटनांवर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फक्त एक दिवस उरला आहे. आता निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान, राष्ट्रीय कला मंचनं बुधवारी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू)मध्ये 'बस्तर-द नक्सल स्टोरी'चं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केलं होतं. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्रीनिंग सुरू असताना वीज दोनदा खंडित झाली होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जेएनयूमध्ये 'बस्तर-द नक्सल स्टोरी' स्पेशल स्क्रीनिंग : या स्पेशल स्क्रिनिंगसाठी चित्रपटाची टीम जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पोहोचली होती. स्क्रीनिंग वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेनही उपस्थित होते. देशात माओवाद्यांच्या दहशतीनं त्रस्त असलेल्या छत्तीसगडच्या बस्तरची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आता स्क्रीनिंगचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, यावेळी जेएनयू प्रशासनाकडून वीज खंडित करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले होते. मात्र तरीही विद्यार्थ्यांनी चित्रपटाचे संपूर्ण स्क्रीनिंग पाहिले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुदीप्तो सेन म्हटलं, ''जेएनयूमध्ये मूठभर डाव्या विचारसरणीमुळे विद्यार्थी बदनाम झाले आहेत. देशाला प्रथम स्थान देणारे हजारो विद्यार्थी जेएनयूमध्ये शिकतात हे बाहेरच्या लोकांना माहीत नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून बस्तरच्या माओवाद्यांच्या दहशतीग्रस्त भागाची कहाणी दाखवण्यात आली आहे. तेथील निरपराध रहिवाशांचा डाव्यांकडून स्वतःच्या फायद्यासाठी कसा निर्दयीपणे वापर केला जातो , हे या चित्रपटात आहे.''

'बस्तर-द नक्सल स्टोरी' रिलीजची तारीख जाणून घ्या : विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि आशिन ए शाह सह-निर्मित, 'बस्तर: द नक्सल स्टोरी'चं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलंय. यामध्ये अदा शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. 'बस्तर-द नक्सल स्टोरी' चित्रपट 15 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अदा शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती याआधी 'द केरळ स्टोरी'मध्ये दिसली होती. पुढं ती 'कोशन मार्क' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. ऑस्कर-विजेती बिली इलिशचे 'व्हाट आय वाज मेड फॉर' गाणे श्रोत्यांच्या मनाला भिडले
  2. पुलकित सम्राट पिवळ्या रंगाच्या पोशाखात लग्नाच्या ठिकाणी झाला रवाना ; व्हिडिओ व्हायरल
  3. कबीर सिंगवर टीका करणाऱ्या किरण रावनं व्यक्त केली 'अ‍ॅनिमल' पाहण्याची इच्छा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.