ETV Bharat / entertainment

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात थिरकले तिन्ही खान

author img

By ANI

Published : Mar 3, 2024, 11:18 AM IST

Updated : Mar 3, 2024, 1:25 PM IST

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी एकत्र येत डान्स केला. या सोहळ्याची छायाचित्रे, व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Anant Ambani and Radhika Merchant
Anant Ambani and Radhika Merchant

जामनगर (गुजरात) Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी, उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगच्या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी डान्स करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

आमिर, सलमान आणि शाहरुखनं RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स करत पाहुण्यांना मंत्रमुग्ध केलंय. या कार्यक्रमानिमित्त शाहरुख खान, सलमान, आमिर खान अनेक वर्षांनंतर एकत्र आलेले पहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. SRK च्या फॅन क्लबनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, शाहरुख, सलमान आणि आमिर यांनी कार्यक्रमासाठी कुर्ता पायजमा घातल्याचं दिसत आहे.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीला स्टार्सची हजेरी : शाहरुख खान-गौरी खानपासून ते रणबीर कपूर-आलिया भट्टपर्यंत, संपूर्ण बॉलिवूडनं अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या जामनगरमधील प्री-वेडिंग पार्टीला हजेरी लावली. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी गायिका रिहानानं पाहुण्यांना तिच्या तालावर नाचवलं. दुसऱ्या दिवशी बॉलीवूड स्टार्सनी कार्यक्रमाचं ग्लॅमर वाढवलं. या प्री वेडिंगमध्ये जान्हवी कपूर, शिखर पहाडिया, सोनम कपूर, आनंद आहुजा, रितेश आणि जेनेलिया देशमुख, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, सुहाना खान, नव्या नवेली नंदा, सारा तेंडुलकर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, सोनम कपूर, सोनम कपूर, नताशा पूनावालासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

जामनगरची जगभरात चर्चा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न 12 जुलै 2024 रोजी होणार आहे. त्यापूर्वी जामनगरमध्ये आयोजित तीन दिवसीय प्री-वेडिंग इव्हेंटचा जोरदार सोहळा सुरू आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात अंबानींच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या सोहळ्यात जगभरातील चित्रपट, राजकारण, क्रीडा आणि व्यवसाय अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत.

हे वाचलंत का :

  1. पॉप क्विन रेहाना झाली 'सैराट', जान्हवी कपूरसह केला 'झिंगाट'वर डान्स
  2. जबरदस्त परफॉर्मन्सनंतर रिहाना मायदेशी रवाना, भारतात परतण्याची व्यक्त केली इच्छा
  3. शाहरुख आणि रणवीरची अनंत-राधिकांच्या प्री-वेडिंग पार्टीत ड्वेन ब्राव्होसह पोज
Last Updated : Mar 3, 2024, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.