ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार-टायगरचा 'व्हॅलेंटाईन्स डे'ला 'रोमान्स नव्हे ब्रोमान्स', 'बडे मियाँ'च्या हातावर 'छोटे मियाँ'ची कसरत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 2:50 PM IST

Updated : Feb 14, 2024, 3:59 PM IST

Akshay Kumar and Tiger Shroff : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियाँ आणि छोटे मियाँ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी या जोडीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Akshay Kumar and Tiger Shroff
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ

मुंबई - Akshay Kumar and Tiger Shroff : आपल्या ॲक्शन आणि स्टंटफुल चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ जोडी 'बडे मियाँ आणि छोटे मियाँ'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगर ॲक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहेत. दोघेही सतत सोशल मीडियावर एकत्र पोस्ट करत आहेत आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आज 'व्हॅलेंटाईन्स डे' 2024 च्या निमित्तानं या जोडीनं सुंदर फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी दोघेही राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला गेले नव्हते, तेव्हा त्यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. याशिवाय एका अवार्ड शोमध्ये देखील त्यांनी एकत्र परफॉर्मन्स दिला होता.

अक्षय आणि टायगरची पोस्ट : दरम्यान अक्षय आणि टायगरच्या या पोस्टमध्ये दोघेही एकमेकांचे हात घट्ट पकडून दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अक्षयनं टायगरला हातावर सरळ उभे केले आहे. अक्षय आणि टायगरचा फोटो स्टंटफुल आहे. हा फोटो शेअर करताना अक्षय आणि टायगरनं लिहिलं, ''या व्हॅलेंटाईन डेवर रोमान्सपेक्षा ब्रोमान्स.'' अक्षय आणि टायगरच्या फोटोवर अनेकजण कमेंट्स देत या जोडीचे कौतुक करत आहेत.

बडे मियाँ आणि छोटे मियाँ बद्दल : 'बडे मियाँ और छोटे मियाँ' हा 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला एक ॲक्शन पॅक्ड चित्रपट आहे, जो 'भारत' आणि 'टायगर जिंदा है'चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी बनवला आहे. अक्षय, टायगरबरोबर असलेल्या या चित्रपटात साऊथचा अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एकाच पडद्यावर अक्षय, टायगर आणि सुकुमारन हे तीन मोठे स्टार्स एकत्र दिसणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा आणि अलाया एफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. अक्षय आणि टायगरला त्याच्या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. कारण याआधी अक्षयचा रिलीज झालेला 'मिशन राणीगंज' हा फ्लॉप झाला होता. याशिवाय टायगरचा 'गणपथ' देखील बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नव्हता.

हेही वाचा :

  1. बॉलिवूडची गाणी आणि दृष्यातून सजलेला 'व्हॅलेंटाईन्स वीक'चा प्रत्येक दिवस
  2. 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त पाहा काही विशेष रोमँटिक चित्रपट
  3. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूने दिल्या त्यांच्या 'व्हॅलेंटाईन फॉरएव्हर'ला शुभेच्छा
Last Updated : Feb 14, 2024, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.