ETV Bharat / entertainment

आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर'च्या रिलीजची तारीख, स्क्रिप्टचे अपडेट केले शेअर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 3:59 PM IST

आमिर खान त्याच्या आगामी 'लापता लेडीज' प्रॉडक्शनच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. IIM बेंगळुरू येथे एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान आमिरने त्याच्या आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर'च्या रिलीजची तारीख सांगितली. प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटातून आमिर खान 'लाल सिंग चड्ढा'नंतर पुन्हा पडद्यावर परतणार आहे.

Aamir Khan
आमिर खान

मुंबई - आमिर खान, दिग्दर्शक किरण राव यांच्यासह, आयआयएम बेंगळुरू येथे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने बनवलेल्या 'लापता लेडीज'च्या स्क्रिनिंगला उपस्थित राहिला. यावेळी अनेक विषयावर त्यानं उपस्थित चाहत्यांशीही संवाद साधला.

कार्यक्रमादरम्यान आमिरने, तो अभिनय करत असलेल्या आगामी चित्रपटाचाही खुलासा केला. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट नव्या कथानकासह, नवीन कलाकार यांना घेऊन बनवणार असल्याचे तो म्हाणाला. त्याचा पूर्वीचा 'तारे जमीन पर' हा चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. आता 'सितारे जमीन पर' पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात 'आसू' नाही तर 'हासू' येणार असल्याचे त्याने सांगितले.

2022 मध्ये रिलीज झालेल्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात आमिर खान अखेरचा झळकला होता. त्याने स्क्रीनिंगनंतरच्या मीडिया संवादादरम्यान त्याच्या पुढील प्रोजेक्टबद्दल उत्सुकतेने अपडेट्स दिले. त्याने खुलासा केला की, 'सितारे जमीन पर'चे शूटिंग फेब्रुवारीमध्ये सुरू झाले आहे आणि हा चित्रपट येत्या ख्रिसमसला रिलीज करण्याची तो तयारी करत आहे.

प्रसन्ना द्वारे दिग्दर्शित या चित्रपटात जेनेलिया देशमुख -डिसोझा मुख्य भूमिकेत आहे. 'सितारे जमीन पर' हा एक आकर्षक सामाजिक नाट्यमय चित्रपट असणार आहे. आमिर खान 70 ते 80 दिवसांच्या शूटिंगच्या मोठ्या शेड्यूलची तयारी करत असून तो कलाकारांसह स्क्रिप्ट वाचण्यात तो सक्रियपणे गुंतला आहे. अलिकडे त्याची आई आजारी आहे. त्यामुळे तिच्यासाठी वेळ देण्याचा तो भरपूर प्रयत्न करत असतो. यातूनच सवड काढून त्याने नव्या चित्रपटाच्या शूटिंगला वेळ दिला आहे.

दरम्यान, आमिरचे आमिर खान प्रॉडक्शन्स बॅनरखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. 'लाहोर 1947' या चित्रपटात तो सनी देओलसह काम करणार आहे. त्याचा मुलगा जुनैद खान आणि साई पल्लवी यांच्यासह तो आगामी रोमँटिक चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या जपानमध्ये सुरू आहे. त्याचा मुलगा जुनैद पदार्पण करत असलेल्या चित्रपटातही झळकणार आहे.

हेही वाचा -

  1. 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त पाहा काही विशेष रोमँटिक चित्रपट
  2. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूने दिल्या त्यांच्या 'व्हॅलेंटाईन फॉरएव्हर'ला शुभेच्छा
  3. वरुण तेज स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची टीम पुलवामा स्मारक स्थळाला भेट देणार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.