ETV Bharat / bharat

रायबरेली मतदारांना सोनिया गांधींचे भावनिक पत्र, काय आहे राजकीय अर्थ?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 6:29 PM IST

Sonia Gandhi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतील मतदारांना भावनिक पत्र लिहलं आहे. तसंच रायबरेली मतदार संघातून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहे. याबाबत ETV भारतचे अमित अग्निहोत्री यांनी आढावा घेतला.

Sonia Gandhi
Sonia Gandhi

नवी दिल्ली Sonia Gandhi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदार संघातून सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी-वड्रा यांना उमेदवारी देण्याचे संकेत सोनिया गांधींनी दिले आहेत. सोनिया गांधी यांनी 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत खासदार राहुल गांधी तसंच मुलगी प्रियांका गांधी-वड्रा यांची देखील उपस्थिती होती.

रायबरेलीच्या मतदारांचे मानले आभार : “वयासह आरोग्याच्या कारणांमुळं 'मी' आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्यामुळं मला तुमची प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन सदैव तुमच्या पाठीशी असेल. मला माहित आहे, तुम्ही नेहमीच माझ्या कुटुंबाची काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे”, असं म्हणत सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानले आहेत.

  • प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी? :अनेक दशकांपासून रायबरेलीसह अमेठी मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्या प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी, राहुल गांधी केरळमधील वायनाड व्यतिरिक्त अमेठीची जागा देखील लढवू शकतात, अशी चर्चा सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे.

स्थानिक नेत्यांमध्ये उत्साह- काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी 2019 मध्ये अमेठीत पराभव पत्कारावा लागला होता. त्यावेळी सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या. तसंच 2019 ते 2023 पर्यंत प्रियंका गांधीं उत्तर प्रदेशच्या AICC प्रभारी होत्या. त्यामुळं त्यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाल्यानं स्थानिक नेत्यांमध्ये उत्साह आहे. प्रियंका गांधी सध्या 19 फेब्रुवारी रोजी अमेठीमध्ये होणाऱ्या राहुल गांधींच्या मेगा रॅलीच्या तयारीत व्यस्त आहेत. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 16 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात पोहचणार आहे. तसंच 19 फेब्रुवारीला अमेठीमध्ये तर, 20 फेब्रुवारीला रायबरेलीला पोहोचणार आहेत.

प्रियंका गांधींच्या नियमित बैठका : “सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी गेली अनेक दशके अमेठी तसंच रायबरेली मतदारसंघ सांभाळत आहेत. विशेषतः त्यांचा रायबरेलीशी जवळचा संबंध आहे. सोनिया गांधी त्यांच्या मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देऊ शकल्या नसल्यानं गेल्या पाच वर्षांपासून प्रियंका गाधी या रायबरेली मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. तसंच जिल्हा काँग्रेस समित्यांच्या नियमित बैठका घेत आहेत," असं स्थानिक नेते दीपक सिंग यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं.

“प्रियांका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेबद्दल आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही 19 फेब्रुवारी रोजी अमेठीमध्ये मोठ्या रॅलीची तयारी करत आहोत. या रॅलीला प्रियंका गांधी देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे,” - दीपक सिंग, काँग्रेस नेते

“राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. तसंच प्रियंका गांधी देशपातळीवरील महत्वाच्या नेत्या आहेत. मात्र, त्यांनी कुठून निवडणूक लढवायची 'हे' गांधी कुटुंबानं ठरवायला हवं,” असं एआयसीसीचे यूपीचे प्रभारी सचिव प्रदीप नरवाल यांनी सांगितलं.

माझं कुटुंब तुमच्याशिवाय अपूर्ण : पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानणाऱ्या पत्रात सोनिया गांधी यांनी पत्रात लिहिलं आहे की, 'दिल्लीत माझं कुटुंब तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. आमचं कुटूंब रायबरेलीमध्ये येऊन तुम्हाला भेटल्यानंच पूर्ण होतं. हे जवळचं नातं खूप जुनं आहे. रायबरेलीशी आमच्या कुटुंबाच्या नात्याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांनी माझे सासरे फिरोज गांधी यांना विजयी करून दिल्लीला पाठवलं होतं. त्यानंतर तुम्ही माझ्या सासू दिवंगत इंदिरा गांधींना आपलंसं केलं. तेव्हापासून हा ट्रेंड कायम आहे. जीवनातील चढ-उतार, खडतर मार्गातून आम्ही प्रेमानं, उत्साहानं पुढे निघालो. त्यामुळं आमचा विश्वास आणखी दृढ झालाय.

  • तुम्ही कायम माझ्या पाठीशी : सोनिया गांधी पुढं लिहतात की, "माझ्या प्रियजनांना गमावल्यानंतर, तुम्ही मला पदरात घेतलं. गेल्या दोन निवडणुकांत तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात, हे मी कधीच विसरू शकत नाही. आज मी जे काही आहे, ते तुमच्यामुळेच आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो. हा विश्वास पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे."

पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : 'प्रकृती समस्या आणि वाढत्या वयामुळं मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. या निर्णयानंतर मला तुमची थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही. पण माझं मन सदैव तुमच्या पाठीशी राहील हे निश्चित. आजवर जशी तुम्ही माझी काळजी घेत आलात, तशीच काळजी तुम्ही माझ्या कुटुंबाची घ्याल, असं सोनिया गांधींनी पत्रात नमूद केलं आहे.

हे वाचलंत का :

  1. पहले भी साथ मे थे लेकीन अब बहार आई है..; अशोक चव्हाण यांना भेटल्यानंतर प्रफुल पटेल यांचं सूचक वक्तव्य
  2. मिलिंद देवरांचा शिवसेनेशी काय संबंध, ही एकनाथ शिंदे यांची मोठी हार; संजय राऊतांचा टोला
  3. काँग्रेस विधिमंडळ बैठकीला सहा आमदार गैरहजर: 'ते' आमदार भाजपाच्या संपर्कात?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.