ETV Bharat / bharat

कतारमध्ये अडकलेल्या माजी अधिकाऱ्यांना शाहरुख खाननं सोडवलं? किंग खानच्या टीमनं केला खुलासा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 10:31 PM IST

Shahrukh Khan Role in Veterans Release from Qatar : अभिनेता शाहरुख खाननं कतारमधून आठ माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात खुलासा करताना शाहरुख खानच्या टीमनं ही चर्चा निराधार असल्याचं म्हटलं आहे.

no role of shah rukh khan in indian naval officers release in qatar subramanian swamy claims false said by king khan team
सुब्रम्हण्यम स्वामींच्या दाव्यावर किंग खानच्या टीमनं सोडलं मौन

मुंबई Shahrukh Khan Role in Veterans Release from Qatar : कतारमधून 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननं मदत केल्याचा दावा भाजपाचे नेते तथा माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. त्याबाबत त्यांनी एक्स या सोशल मीडियात पोस्ट केली. मात्र, ही माहिती निराधार असल्याचं शाहरुख खानच्या टीमनं म्हटलं आहे. सोशल मीडियावरील नेत्याच्या या वक्तव्यानंतर आता शाहरुख खानच्या टीमनं टीमने आज (13 फेब्रुवारी) एक निवेदन जारी करून नेत्याचं हे वक्तव्य निराधार असल्याचं म्हटलं आहे.

किंग खानच्या टीमनं काय म्हटलंय? : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर देशभरात पंतप्रधान मोदींच्या कुटनीतीचं कौतुक करण्यात आलं. अशा स्थितीत भाजपाच्याच नेत्यानं या प्रकरणात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं सोशल मीडियात चर्चेला पेव फुटले. त्याबाबत अखेर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी गुरनानी यांनी अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी निवेदनात म्हटलं की, "कतारमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यासंदर्भात शाहरुख खानचा कोणताहा सहभाग नाही. त्यासंदर्भातचे दावे निराधार आहेत. नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेचं संपूर्ण श्रेय हे भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळे नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या सूटकेबाबत शाहरुख खानचा सहभाग नाही.

माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं होतं? : भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक्स या सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या यूएई आणि कतार दौऱ्याबाबतची पोस्ट रिशेअर केली. त्यावर त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांनी स्टार शाहरुख खानला कतारच्या दौऱ्यावर न्याव. कारण, परराष्ट्र मंत्रालय हे कतारच्या शेखांना सहमत करण्यास अपयशी ठरले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी शाहरुख खानला हस्तपेक्ष करण्याची विनंती केली. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी कतार शेखांची महागडा करार करण्यात आला. खरं तर, माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी त्यांच्या अधिकृत खात्यावर (पूर्वीचे ट्विटर) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट रिट्विट केले आहे. पीएम मोदींच्या ट्विटमध्ये त्यांच्या यूएई आणि कतार दौऱ्याचा उल्लेख आहे.

  • किंग खाननं नुकताच कतारचा केला दौरा : शाहरुख खान नुकताच कतारच्या भेटीवर गेला होता. या भेटीत त्यानं एएफसीच्या अंतिम सामन्यात खास पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. किंग खानच्या फॅन पेजवर शाहरुख खाननं कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी यांचे स्वागत करतानाचा फोटो शेअर केला आहे.
  • भारताच्या माजी नौदल जवानांची सुटका : हेरगिरीच्या कथित प्रकरणात नौदलाच्या माजी आठ अधिकाऱ्यांना ऑगस्ट 2022 मध्ये कतारमध्ये अटक करण्यात आली होती. कतारच्या अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार त्यांच्यावर पाणबुडीवर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागणार होती. याबाबत संपूर्ण देशात चिंता व्यक्त होत असताना त्यांची अचानकपणं सुटका करण्यात आली.

हेही वाचा -

  1. मोदी सरकारची मुत्सद्देगिरी यशस्वी, कतारच्या ताब्यातील 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका
  2. आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा कमी, कतार न्यायालयाचा निर्णय
  3. भारताचं मोठं यश! 8 माजी भारतीय नौसैनिकांच्या फाशीला मिळणार स्थगिती? कतार न्यायालयानं स्वीकारलं अपील
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.