ETV Bharat / bharat

देशातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत मेट्रोची वैशिष्ट्ये?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 9:03 AM IST

Updated : Mar 6, 2024, 11:34 AM IST

Underwater Metro : देशातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ( underwater metro ) पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं धावणार आहे. या मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलंय.

देशातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत मेट्रोची वैशिष्ट्ये?
देशातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत मेट्रोची वैशिष्ट्ये?

कोलकाता Underwater Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचं उद्घाटन केलंय. यासह, पंतप्रधानांनी 15400 कोटी रुपयांच्या मेट्रो संबंधित अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी मेट्रोतून प्रवासाही करणार आहेत. ही मेट्रो हावडा मैदान ते एस्प्लेनेड दरम्यान धावते. या बोगद्यामुळे ट्रेन्स हुगळी नदीच्या तळापासून 32 मीटर खाली धावू शकेल, ज्यामुळं प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईल.

पहिली 'अंडरवॉटर मेट्रो' : पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग म्हणून, देशातील पहिली 'अंडरवॉटर मेट्रो' ट्रेन हावडा आणि एस्प्लेनेड दरम्यान धावेल. या बोगद्यांमध्ये निळ्या दिव्यांनी प्रवाशांचं स्वागत केले जाईल. मेट्रो अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार, 1921 मध्ये हावडा आणि कोलकात्याला ट्यूब रेल्वे सेवेद्वारे जोडण्याची कल्पना ब्रिटिशांनीच मांडली होती. पण, अखेर ती योजना रद्द झाली. मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टची कल्पना 1969 मध्ये झाली होती. बराच विचारविनिमय केल्यानंतर कोलकाताचं मेट्रो नेटवर्क तयार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या मार्गांचा निर्णय घेण्यात आला. चार मार्गांपैकी पहिला मार्ग उत्तर-दक्षिण कॉरिडॉर होता. हा मार्ग आज उत्तरेकडील दक्षिणेश्वर ते दक्षिणेकडील न्यू गारियापर्यंत पसरलेला आहे. याचे एकूण अंतर सुमारे 33 किलोमीटर आहे. पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर केंद्रातील यूपीए सरकारनं 2008 मध्ये पुढे नेला. त्यानंतर 2009 मध्ये त्याची पायाभरणी झाली होती.

पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर : या कॉरिडॉरचा नवीन मार्ग सॉल्ट लेक सेक्टर V आणि हावडा मैदान दरम्यानच्या अंदाजे 16.55 किलोमीटर अंतरासाठी तयार करण्यात आला होता. हुगळी नदी ओलांडून कोलकाता आणि हावडा जोडण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न होता. या मार्गाचा पहिला टप्पा सॉल्ट लेक सेक्टर V ते सियालदहपर्यंत आधीच सेवेत आहे. सियालदह रेल्वे स्टेशन हे देशातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या टर्मिनल रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी या मार्गावर स्क्रीन डोअरसह दळणवळण आधारित ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टिमसह अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान बसवण्यात आलंय.

हावडा मेट्रो स्टेशन : हावडा मेट्रो स्टेशन हे पूर्व-पश्चिम कोलकाता मेट्रो कॉरिडॉरचं सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकाची उंची अंदाजे 10 मजली इमारतीइतकी आहे. हावडा मेट्रो स्टेशनपेक्षा जास्त खोली असलेलं भारतातील एकमेव स्टेशन दिल्ली मेट्रोचं हौज खास स्टेशन आहे. हावडा मेट्रो रेल्वे स्थानकात पाच स्तर, चार मार्ग आणि प्लॅटफॉर्म आहेत.

पाण्याखालील विस्तार : बोगद्याच्या माध्यमातून हुगळी नदीखाली ट्रेन धावणार आहेत. त्यांना पाण्याखालील बोगदे म्हणतात. टनेल बोरिंग मशिनच्या साहाय्यानं दोन समांतर बोगदे खोदण्यात आले. पाण्याच्या वस्तुमानासह पृथ्वीचा दाब संतुलित केलाय. या बोगद्याची लांबी 520 मीटर असून यात ताशी 80 किलोमीटर वेगानं गाड्या धावू शकतात. रेल्वेच्या प्राथमिक अंदाजानुसार, गर्दीच्या वेळेत प्रवासी घनता सुमारे 30,000 प्रवासी असेल. तर पाण्याखालील प्रवासाचा सरासरी वेळ 45 सेकंद असेल.

आपत्कालीन व्यवस्था : जेव्हा पाण्याखालील विस्ताराची कल्पना केली जात होती, तेव्हा आपत्कालीन परिस्थितीमधील नियोजनाला प्राधान्य दिलं जाते. दोन्ही बोगद्यांच्या सर्व बाजूंना पायवाट आहेत. ते वायुवीजन शाफ्टला जोडलेले आहेत. कोणत्याही आपत्कालीन काळात, या शाफ्टमधून वॉकवे वापरुन प्रवाशांना बाहेर काढलं जाऊ शकतं. बोगद्याच्या आत आठ क्रॉस पॅसेज आहेत. ते सहज आणि सुरळीत बाहेर काढण्यासाठी बोगद्यानं जोडलेले आहेत.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदी करणार रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचं ऑनलाइन उद्घाटन
  2. ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, काय झाली चर्चा?
Last Updated : Mar 6, 2024, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.