अमित शहा यांच्यासह योगी अन् आसामचे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; पहा काय आहे माहिती
मथुरा (उत्तर प्रदेश) - गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि आसामचे मुख्यमंत्री यांच्यासह वृंदावनचे महामंडलेश्वर धर्मेंद्र गिरी महाराज यांना उडवून देण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जंत कोतवाली येथे महामंडलेश्वर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरा महामंडलेश्वर यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला त्यामध्ये ही धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले.