One Crore Drugs Seized : 1 कोटींच्या अमली पदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक

By

Published : Apr 21, 2022, 10:33 PM IST

thumbnail

मुंबई : मुंबईच्या मालाड पश्चिम मालवणी पोलिसांनी (Malad West Malvani Police ) नायजेरियन नागरिकाला अटक करून ( Nigerian man arrested ) त्याच्याकडून 5 प्लास्टिक पिशव्यांमध्ये 750 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. ज्याची किंमत 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये ( One Crore Drugs Seized ) आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मालवणी पोलिसांना म्हाडा मैदानाजवळ मालवणी एक नायजेरियन ड्रग्ज विकण्यासाठी येत असल्याची खबर मिळाली. याची खबर मिळताच मालवणी पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून ५ प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यात 750 ग्रॅम एमडी आढळून आले. ज्याची किंमत 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती मालवणी व परिसरात किरकोळ ड्रग्ज विक्रेत्यांना ड्रग्जचा पुरवठा करत असे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.