सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या 'दिल्लीत हुकूमशाही'

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 7:41 PM IST

thumbnail

पुणे Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभेत योग्य उमेदवार दिला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर पवार कुटुंबातीलच दोन व्यक्ती एकमेकांविरोधात लोकसभा लढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली. (Baramati Lok Sabha Constituency) आम्ही लोकशाही मानणारे आहोत. राज्यात लोकशाही आहे, दिल्लीत मात्र हुकुमशाही असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.  

पुण्यातील पाणीप्रश्न गंभीर : सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात पाणी टंचाई गंभीर आहे. पुणे जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. येथील जी धरणे आहेत त्यात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण ङोऊ शकते. मुख्यमंत्री यांना याआधीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असे पत्र दिले आहे. याकडे त्यांनी लक्ष द्यावे. पुढच्या ३ महिन्यात पाण्याचे नियोजन सरकारने तातडीने करावे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.