Rupali Patil Thombre : आमदार गोपीचंद पडळकर डोक्यावर पडलेत, त्यांना डोकं आहे; पण डोक्यातला मेंदू नाही - राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील
पुणे : आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांना डोकं आहे; पण डोक्यातला मेंदू नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष रूपाली पाटील ठोंबरे ( NCP leader Rupali Patil Thombre ) यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे गमछे घालून फिरतात आणि उदय सामंत यांच्या गाडीवर हल्लासुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, अशी टीका केली होती. त्यावर आता रूपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलेले आहे. पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये ( Vishram Bagh Police Station ) तक्रार देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यांनी पुरावे द्यावेत, त्यांनी जर पुरावे नाही दिले, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील यांनी केलेली आहे.