Samata Parishad On Sambhaji Bhide: संभाजी भिडेंची मिशी कापून आणणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस; समता परिषदेची जालन्यात घोषणा

By

Published : Jul 31, 2023, 9:45 PM IST

thumbnail

जालना : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अगोदर महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबतही तसेच वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळत आहेत. भिडेंना तातडीने अटक झाली पाहिजे, यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. जागोजागी आंदोलने झालीत, पुतळे जाळण्यात आले. हे होत असताना ज्योतिबा फुलेंबाबतही वादग्रस्त विधान केल्याने समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडे यांची मिशी जो कोणी कापून आणेल त्याला एक लाखाचे बक्षीस समता परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. यासाठी वर्गणी गोळा केली जाईल, असे जालना जिल्ह्याचे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात घोषणा केली. विशेष म्हणजे, संपूर्ण राज्यभरात संभाजी भिडेंविषयी संताप वाढत चालला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.