कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मनोज जरांगेंची जाहीर सभा
कोल्हापूर Manoj Jarange Kolhapur sabha : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा नुकताच सुरू झाला आहे. ते आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात जाहीर सभा घेणार आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेसाठी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ व्यासपीठ उभारण्यात आलं असून, छत्रपती शाहू महाराज सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला सुमारे दोन लाखांहून अधिक मराठा बांधव उपस्थित राहतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे दोन टप्प्यात उपोषण केलं होतं. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. ते या सभेत काय बोलणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.