राज्यात क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला! मुंबईवरून अहमदाबादला जाण्यासाठी विशेष ट्रेनमध्ये गर्दी, तर नागपूरात ढोल पथकाचा जल्लोष

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 10:29 AM IST

thumbnail

मुंबई Cricket World Cup 2023 Final : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आमने-सामने येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मध्य रेल्वेनं अहमदाबादेत होणाऱ्या आजच्या सामन्याला जाण्यासाठी तीन विशेष रेल्वे चालवण्याचं जाहीर केलं.  त्यानंतर आज क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं अहमदाबादला पोहोचत आहेत. दरम्यान, ज्या क्षणाची वाट जवळपास दीड महिना पाहिली गेली, तो क्षण आता अवघ्या काही तासांवर आला आहे. त्यामुळं सर्वत्र उत्साहाच वातावरण पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी अन् त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवज्ञान प्रतिष्ठानचे सदस्य नागपूरात पारंपारिक महाराष्ट्रीयन ढोल वाजवत आहेत.                    

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.