109 Heroin Capsules in Stomach : प्रवाशाच्या पोटातून 109 हेरॉईन कॅप्सूल जप्त, विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांची कारवाई

By

Published : May 4, 2022, 4:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

thumbnail

हैदराबाद- अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी गुन्हेगार नेहमीच विविध शक्कल ( Heroine smuggling case ) लढवितात. मात्र, सीमाशुल्क विभागाचे अधिकारी गुन्हेगाराचे असे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडतात. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ( Customs Intelligence Unit officials ) शमशाबाद विमानतळावर टांझानियाचा रहिवासी असलेल्या प्रवाशाला ताब्यात ( Heroine in Shamshabad Airport ) घेतले. हा प्रवासी 26 एप्रिल रोजी झोहेनबर्गहून हैदराबादला आला होता. त्याने हेरॉईनच्या कॅप्सूल गिळल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी आरोपीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले. डॉक्टरांनी 6 दिवसात त्याच्या पोटातून 109 कॅप्सूल ( 109 capsules from stomach ) काढले. त्याचे वजन 1,389 ग्रॅम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 11.53 कोटी रुपये आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.