साकीनाका बलात्कार प्रकरण : दुर्दैवी घटना टाळण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज - सुनील केदार

By

Published : Sep 11, 2021, 4:54 PM IST

Updated : Sep 11, 2021, 5:27 PM IST

thumbnail

नागपूर - मुंबईत घडलेली बलात्काराची घटना ही दुर्दैवी आहे. शासन कारवाई करण्यास कुठेही मागे राहणार नाही. कारवाईच्या अनुषंगाने कडक भूमिका सरकार म्हणून घेईल. पण केवळ कायदे करून हे प्रश्न सुटणार नाहीत तर लोकप्रबोधनाची गरज आहे. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता आणून भेदभाव नष्ट करण्यास मदत होऊ शकेल राज्याचे असेही मंत्री सुनील केदार म्हणाले. ते नागपुरात एका स्पोर्ट जर्नालिस्ट असोसिएशन येथे आयोजित पत्रकांरांशी संवाद दरम्यान बोलत होते. सगळ्यांनी मिळून ही मानसिकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी प्रशासन शासन, समाज लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्था सर्वांनी एकत्र येऊन ही विकृत मानसिकता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

Last Updated : Sep 11, 2021, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.