Women's Day 2022 : महिला दिवस उत्साहात साजरा, बुलेटस्वार महिला ठरल्या आकर्षण

By

Published : Mar 8, 2022, 1:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail

औरंगाबाद - महिला दिन निमित्त शहरात सकाळपासूनच महिलांची धूम पाहायला मिळाली. (International Women's Day 2022) सकाळच्या सुमारास डोक्यावर फेटा घालून पारंपरिक वेशभूषेत बुलेटस्वार महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर क्रांती चौकात आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. (International Women's Day) जिल्हा क्रीडा अधिकारी मार्फत महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च मंगळवार रोजी महिलांची वाहन रॅली काढण्यात आली. विभागीय क्रीडा संकुल, जालना रोड, क्रांती चौक, पैठण गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. (History of Women's Day) या रॅलीत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बुलेटस्वार महिला प्रमुख आकर्षण ठरल्या. या रॅलीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, झुंबा डान्स असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.