BJP Vs Shiv Sena : मुंबईत भाजप- शिवसेना कार्यकर्ते आमने- सामने.. महापौर आणि भाजप आमदारांसमोरच जोरदार घोषणाबाजी

By

Published : Feb 19, 2022, 7:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

thumbnail

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ( BMC Election 2022 ) आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे विकासकामाच्या श्रेयवादाची लढाई जोरदार सुरू झाली ( BJP Vs Shiv Sena ) आहे. कांदिवली पश्चिमेतील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलावाचे ( Sardar Vallabhbhai Patel Olympic Swimming Pool ) आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. यावेळी भाजप आमदार योगेश सागर ( BJP MLA Yogesh Sagar ) हेही उद्घाटनप्रसंगी हजर झाले. या जलतरण तलावाच्या बाजूला दोन्ही पक्षांनी आपआपले बॅनर्स लावले होते. तसेच भाजप आणि शिवसेना पक्षाचे मोठ्या प्रमाणत झेंडे घेऊन हजर होते. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार योगेश सागर हे कार्यक्रमस्थळी आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजू केली. यामुळे याठिकाणी मोठा पोलीस आणि पालिका सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमप्रसंगी जोरदार घोषणाबाजी देखील केली. मात्र, काही वेळाने वातावरण निवळण्यासाठी महापौर आणि आमदार दोघे ही एकच व्यासपीठावर आले आणि त्यांनी मार्गदर्शन केले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.