Chandrashekhar Bawankule : राज्य सरकार ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र करत आहे- चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Apr 7, 2022, 5:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail

नागपूर - राज्य सरकार ओबीसी समाजाविरोधात आणखी एक षड्यंत्र करत ( State Government Conspiracy Against OBC ) असून, गरज नसलेली माहीती का गोळा करत आहे असा सवाल भाजपचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे ( BJP MLC Chandrashekhar Bawankule ) यांनी केला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ते प्रेस क्लब येथे माध्यमांशी बोलत होते. राज्य ओबीसी आयोग ( State OBC Commission ) १९६० ते १९९४ या काळातील ग्राम पंचायत, पंचायत समिती, आणि जिल्हा परिषद मध्ये कोणते सदस्य कोणत्या प्रवर्गातुन निवडून गेले त्या सदस्यांची गोपनीय माहिती गोळा करत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाविरोधात हे सरकार काही षड्यंत्र करत असल्याचे यावरुन दिसत आहे. गरज नसताना अशाप्रकारे जातीनिहाय माहिती मागण्याची काय गरज आहे. आरक्षणातून ओबीसींच्या काही जातींना डावलण्याचे ( Remove Some Casts From OBC Reservation ) डाव दिसून येत आहे. यावर मुख्यमंत्री, ओबीसी मंत्री यांनी लक्ष द्यावे. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ( OBC Reservation In Supreme Court ) सुरु आहे. आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने चांगली बाजू मांडावी, आता आरक्षण मिळाले नाही तर राज्य सरकारला सोडणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.