Restrictions in Maharashtra Are Being Lifted : खुषखबर..! गुढीपाडव्यापासून राज्य होणार निर्बंधमुक्त, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

By

Published : Mar 31, 2022, 6:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

thumbnail

मुंबई - गुढीपाडव्यापासून (दि. 2 एप्रिल) राज्यातील सर्व निर्बंध हटविण्यात येत ( Restrictions in Maharashtra Are Being Lifted ) आहेत, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी केली आहे. पाढव्यानंतर राज्यात लागू असलेले साथ रोग नियंत्रक नियमही शिथील करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मास्क, सोशल डिस्टन्सिंग, टेस्ट, डोस याबाबतच्या सर्व अटी शिथील करण्यात येत असल्याचा निर्णय गुरुवारी (दि. 31 मार्च) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहितीही मंत्री टोपे यांनी दिली. मात्र, अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने काळजी म्हणून मास्कचा वापर करा, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.