ETV Bharat / sukhibhava

डोकेदुखीचेही आहेत 6 प्रकार; काय आहेत लक्षणं, वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 10:25 AM IST

Types of Headache : वाढत्या कामाच्या ताणामुळं अनेक लोक अनेक समस्यांना बळी पडतात. डोकेदुखी ही अशा समस्यांपैकी एक आहे. ज्यामुळं आपल्या आजूबाजूचे बरेच लोक त्रस्त असलेले दिसून येतात. डोकेदुखीचा दैनंदिन क्रियाकलापांवर लक्षणीय परिणाम होतो. अशा स्थितीत लोक औषधांचा किंवा बाम वगैरेंचा सहारा घेतात त्यामुळे आराम मिळतो. डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत जे ओळखणं आवश्यक आहे.

Types of Headache
डोकेदुखीचेही आहेत 6 प्रकार

हैदराबाद : Types of Headache डोकेदुखीमुळे तुमची संपूर्ण दिनचर्या विस्कळीत होते. ज्या दिवशी डोकं जड होईल त्या दिवशी काहीच बरे वाटत नाही. अशा परिस्थितीत काही लोक स्वतःहून वेदनाशामक औषध घेऊन त्यांच्या वेदना कमी करतात. त्याचबरोबर काही लोक तेल किंवा बाम लावून मसाज करतात, पण डोकेदुखीच्या प्रकारानुसार उपचार केल्यास बरे होते. कारण सर्वच डोकेदुखी सारखी नसते. कधी कधी पूर्ण डोक दुखतं तर कधी अर्ध डोकं दुखतं. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्या प्रकारची डोकेदुखी आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून वेदनांवर योग्य उपचार करता येतील. जाणून घेऊया डोकेदुखीचे विविध प्रकार.

  • सायनस : यामध्ये सायनसभोवती वेदना जाणवतील, डोळे आणि कपाळाभोवती दाब जाणवेल. डोके वाकवताना किंवा वळवताना वेदना वाढतात.
  • टेन्शन : तणावामुळे डोकेदुखी झाल्यास संपूर्ण डोके सतत जड राहते. डोक्याच्या दोन्ही बाजूंना, विशेषत: कपाळावर लांब पट्ट्यामध्ये सतत वेदना होतात. यामध्ये उलट्या किंवा मळमळ होत नाही.
  • मायग्रेन : मायग्रेन ही एक प्रकारची थ्रॉबिंग वेदना आहे, ज्यामध्ये डोक्याच्या एका बाजूला वेदना सुरू होते आणि ही वेदना वाढते. यात उलटी, मळमळ यांसारखी लक्षणेही दिसून येतात. प्रकाश पाहिल्यानंतर किंवा आवाज ऐकल्यानंतर ही वेदना आणखी वाढते. कोणत्याही शारीरिक हालचालींसह ही वेदना वाढते. हे काही तासांपासून काही दिवस होवू शकते.
  • क्लस्टर हेड : ही वेदना क्लस्टर्समध्ये उद्भवते, याचा अर्थ असा होतो की असह्य वेदना बहुतेक वेळा डोक्याच्या एका बाजूला क्लस्टरमध्ये होते. या वेदना कधीही अचानक होतात आणि तीव्र वेदना होतात. या डोक्यात दुखण्याबरोबरच डोळ्यांच्या आजूबाजूलाही वेदना होतात. धूम्रपान किंवा व्यायामामुळे ही वेदना वाढते.
  • टीएमजे डिसऑर्डर : टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट (टीएमजे) डिसऑर्डरमुळे डोक्यासह जबड्याभोवती तीव्र वेदना होतात. जबडा किंवा चेहऱ्यावर घट्टपणा येणे, जबडा दाबणे ही देखील त्याची लक्षणे आहेत. 80% टीएमजे डिसऑर्डर वेदना इतर काही वेदनांचा परिणाम आहे. हे अल्प कालावधीसाठी घडते. दात घासताना, चघळताना, बोलताना किंवा जांभई घेताना वेदना वाढते.
  • ऍलर्जी डोकेदुखी : नाक, गालाची हाडे, कपाळ आणि कानांच्या वरच्या बाजूला हलके दुखणे ही ऍलर्जी डोकेदुखी असू शकते. हे परागकण ऍलर्जी किंवा धूळ ऍलर्जीमुळे असू शकते.

हेही वाचा :

  1. चहा बनवताना आणि पिताना करू नका 'या' चुका; अन्यथा आरोग्याची होऊ शकते हानिकारक
  2. हिवाळ्यात लिंबू, मधासह पाणी पिल्यानं होतील 'हे' फायदे
  3. 'या'मुळं जमा होऊ लागतो छातीत कफ, करा 'हे' उपाय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.