ETV Bharat / sukhibhava

त्वचेची चमक वाढवायची आहे? मग 'ही' क्रिया ठरू शकते फायदेशीर

author img

By

Published : Nov 18, 2021, 5:48 PM IST

स्किन फास्टिंग (skin fasting) सध्या ट्रेंडमध्ये आहे. जाणकार आणि तज्ज्ञ असे मानतात की, ते आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक (skin glow tips) वाढवते, याचबरोबर बाह्य त्वचेसंबंधी समस्या देखील कमी करते. स्किन फास्टिंग काय आहे? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

skin fasting
त्वचा

सणांमध्ये लोक इश्वराच्या भक्तीसाठी उपवास ठेवतात. त्याला इंग्रजीमध्ये फास्टिंग असे म्हणतात, मात्र व्रत ठेवल्याने आरोग्याला फायदा होते, असे देखील मानले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी देखील लोक फास्टिंग करतात, ते स्किन फास्टिंग (skin fasting) असून ते चेहऱ्यावर नैसर्गिक चमक (face glow tips) आणते, असे तज्ज्ञ मानतात. आजकाल तरुणांमध्ये देखील स्किन फास्टिंगचा खूप ट्रेंड आहे.

काय आहे स्किन फास्टिंग?

सौंदर्य तज्ज्ञ मीनू वर्मा (Beauty expert Meeu Verma tips) सांगतात की, प्रदूषण, अयोग्य आहार सवयी, अव्यवस्थित जीवनशैली आणि अनेकदा आवश्यक्तेपेक्षा जास्त मेकअप उत्पादनांचा वापर विशेषत: रसायन युक्त उत्पादनांचा वापर यांसारखे अनेक कारण आहेत जे आपल्या त्वचेवर परिणाम करतात. अशात कधी-कधी स्किन फास्टिंग करणे म्हणजेच, त्वचेला नैसर्गिकरित्या बरे होण्यासाठी सोडून देणे, इतकेच नव्हे तर, आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीननुसार कोणत्याही प्रकारचे उत्पादन जसे, क्लिन्जर, टोनर, सनस्क्रिम, मॉइस्चरायझरचा वापर न करणे किंवा कमी प्रमाणात करणे, फायद्याचे ठरू शकते.

मीनू (Beauty expert Meeu Verma) सांगतात की, वर्तमान काळात लोकांमध्ये त्यांच्या त्वचेविषयी जागरूकता वाढली आहे. केवळ स्त्रियाच नव्हे तर, पुरुष देखील त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध उत्पादने वापरतात. मात्र, या उत्पादनांच्या आवश्यकतेपेक्षा अधिक वापराने त्वचेच्या नैसर्गिक स्वरुपावर परिणाम होतो ज्यामुळे त्वचेमध्ये आढळणारे तेल कोरडे होऊ लागते आणि आपली त्वचा कोरडी, निर्जीव आणि अनाकर्षक होते.

स्किन फास्टिंग अंतर्गत नियमित अंतराने एक किंवा दोन दिवसांसाठी विविध प्रकारचे मेकअप किंवा स्किन केअरचा (रासायनिक) वापर नाही किंवा कमी प्रमाणात केले जाते.

रोज स्किन केअर रुटीन पाळला पाहिजे

मीनू वर्मा सांगतात की, तसे सर्व महिलांनी आणि पुरुषांनी सामान्य आणि दैनंदिन वापरासाठी आपल्या त्वचेला अनुरूप कमीत कमी केमिकल असणाऱ्या स्किन केअर उत्पादनांचा वापर केला पाहिजे. शक्य असल्यास हर्बल किंवा नैसर्गिक उत्पादनांच्या वापरास प्राधान्य दिले पाहिजे, कारण ते त्वचेच्या नैसर्गिक रुपाला अधिक प्रभावित करत नाही. त्याचबरोबर, त्वचेच्या अनुषंगाने संतुलित पद्धतीने स्किन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे. खूप लोकं स्किन केअरच्या नावाने खूप जास्त उत्पादने वापरतात व ते अधिक प्रमाणात वापरतात, जे त्वचेला फायदा देण्याऐवजी त्याला हानी पोहोचवू लागतात. चांगल्या स्किन केअरसाठी क्लिन्जर, सनस्क्रिम, डे क्रीम आणि नाइट क्रिमचा वापर अधिक होतो.

स्किन फास्टिंग कसे करावे?

स्किन फास्टिंगच्या प्रक्रियेने त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि त्याने स्किन आतून डिटॉक्स होते. स्किन फास्टिंग करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

- स्किन फास्टिंगची सुरुवात रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला चांगल्या प्रकारे पाण्याने धुवून करा.

- कोणतेही स्किन केअर उत्पादन न लावता झोपा.

- दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

- जोपर्यंत त्वचा ओलसर वाटते, तोपर्यंत कोणतेही उत्पादन वापरू नका.

- त्वचेवर नैसर्गिक रुपात ओलाव्याचा प्रभाव किती वेळ राहातो, यावर तुम्ही स्किन फास्टिंगचा कालावधी ठरू शकता. असे लोक ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे, ते पाण्याने तोंड धुतल्यानंतर हल्के तेल किंवा पाण्यावर आधारित मॉइश्चरायझर अगदी कमी प्रमाणात लाऊ शकतात.

स्किन फास्टिंग दरम्यान पुढील बाबी लक्षात ठेवा

- त्वचेचे रोग किंवा समस्या असल्यास स्किन फास्टिंग करू नये.

- खूप पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्याचा प्रभाव त्वचेवर दिसून येतो.

- स्किन फास्टिंग एका आठवड्यापेक्षा अधिक करू नये.

- त्वचेवर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू असल्यास स्किन फास्टिंग करू नये.

- नेहमी, संतुलित आणि पचणारे अन्न खा.

- ताण किंवा चिंतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मीनू वर्मा सांगतात की, स्किन फास्टिंग चांगले परिणाम तेव्हाच देऊ शकते जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी असू. त्यामुळे, नेहमी पौष्टिक जेवण करावे, आनंदी राहावे, व्यायाम करावे आणि चांगली जीवनशैली पाळावी.

हेही वाचा - ब्रिस्क वॉक लठ्ठपणा, मधुमेहाचा धोका टाळू शकते; 'या' आजरांवरही फायदेशीर.. वाचा काय आहे ते?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.