ETV Bharat / sukhibhava

Makar sankranti Laddu : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू कडक होत असतील तर वापरा 'ही' अनोखी पद्धत

author img

By

Published : Jan 4, 2023, 3:37 PM IST

Updated : Jan 12, 2023, 11:01 AM IST

लाडू करताना पाक व्यवस्थित झाला नाही तर तिळाचे लाडू कडक (Til Laddu Recipe) बनतात म्हणून पॅनमध्ये थोडे पाणी आणि तूप घाला, आणि त्यात गूळ घालून मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या. तिळाच्या लाडूची रेसिपी थंडीच्या मोसमात केली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते खूप आवडते. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू (Makar Sankranti) बनवतात. तसेच हिवाळ्यात तीळ खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

Makar sankranti 2023
तिळाचे लाडू

हैदराबाद : नवीन वर्ष सुरु व्हायच्याआधीच आपण कोणकोणते सण कोणत्या दिवशी आहेत हे पाहून घेतो, नवीन वर्षाच्या सुरवातीलाच येणार पहिला सण म्हणजे मकर संक्रात (Makar Sankranti). प्राचीन काळापासून हिवाळ्यात मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू बनवले जातात. या वेळी हिवाळ्यात तिळाचे (Make Healthy Sesame Laddu) लाडू जरूर बनवा. चला तर जाणून घ्या तिळाच्या लाडूची (how to make til laddu at home) ही झटपट रेसिपी.

लाडूचे साहित्य व रेसिपी (Ingredients for making Tila Laddu) : तीळ - 200 ग्रॅम, गूळ - 200 ग्रॅम, बदाम - 5-6, काजू - 7-8, तूप - 50 ग्रॅम, वेलची - 4-5, सजवण्यासाठी थोड्या प्रमाणात पिस्ता. (Til Laddu Recipe) : तीळ नीट स्वच्छ करून घ्या. पॅन गरम करा. त्यानंतर तीळ पॅनमध्ये टाका. नंतर मध्यम आचेवर तीळ चमच्याने सतत ढवळत राहा आणि तीळ हलके तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊ द्या. भाजलेल्या तिळातून अर्धे तीळ काढून हलके कुस्करून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये हलकेसे बारीक (Til Laddu Recipe) करावे.

मिश्रण तयार करा : एका कढईत चमचाभर तूप गरम करून त्यात गुळाचे तुकडे टाका त्यासोबतच थोडे पाणी घाला आणि अगदी मंद आचेवर गूळ वितळवून घ्या. गूळ वितळला की, लगेच गॅस बंद करा. गूळामध्ये भाजलेले तीळ घाला. नंतर त्यात काजू, बदाम आणि वेलची पावडर मिसळा. गूळ आणि तिळाचे लाडू बनवण्याचे मिश्रण तयार आहे. एका प्लेटमध्ये पॅनमधून काढा आणि थोडा थंड होऊ द्या. लगेचच लाडू बनवायला (Make Healthy Sesame Laddu) घ्या. लाडू छान गोल आकारात बनवा म्हणजे ते दिसायला पण छान दिसतील. लाडूवर पिस्ता लावा आणि तुमच्या परिवाराला खायला द्या.

आहारदृष्ट्या महत्त्व व फायदे : संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. पोषण आणि वनस्पती प्रथिनांचे स्त्रोत तिळाचे पौष्टिक मूल्य खूप जास्त आहे, म्हणून ते आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. नियमित सेवन केल्याने जळजळ कमी होऊ शकते. हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तणाव आणि नैराश्याशी लढण्यासाठी उपयुक्त आहे. हृदयाशी संबंधित आजारांवरही हे खूप (Benefits of sesame seeds in winter) फायदेशीर आहे.

तिळात काय फरक आहे? : दोन्ही तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण आयुर्वेदानुसार काळ्या तिळाचे सेवन करणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. पांढर्‍या तिळापेक्षा काळे तीळ हे लोहाचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे त्याचे सेवन अधिक फायदेशीर ठरते.

Last Updated : Jan 12, 2023, 11:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.