ETV Bharat / sukhibhava

Back Pain : पाठदुखीने त्रस्त होत असाल तर या तेलांनी करा मसाज; लगेच मिळेल आराम

author img

By

Published : Aug 8, 2023, 12:35 PM IST

सतत बसून राहिल्याने किंवा चुकीच्या स्थितीत बसून राहिल्याने अनेक वेळा पाठदुखीचा त्रास होतो. त्यामुळे चालणे आणि बसणेही कठीण होवून जाते. वेदना कमी करण्यासाठी लोक औषधही घेतात. पण कधीकधी वेदनाशमक औषधांचीही मदत होत नाही. अशा परिस्थितीत आपण पाठीला 'या' तेलांनी मालिश करू शकता.

Back Pain
पाठदुखीने त्रस्त

हैदराबाद : आजकाल 'पाठदुखी' ही एक सामान्य समस्या आहे. अनेकदा लोक पाठीच्या खालच्या भागात दुखण्याची तक्रार करतात. खूप वाकून काम केले तर पाठदुखी होते. विशेषतः महिलांना पाठदुखीचा त्रास जास्त असतो. ऑफिसमध्ये किंवा घरात चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे अनेक वेळा पाठदुखी सुरू होते. पाठदुखी सहजपणे टाळण्यासाठी मसाज केला जाऊ शकतो. दररोज मसाज केल्याने पाठदुखीपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मसाज तेलांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या तेलाने मसाज केल्याने तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळेल.

  • मोहरीचे तेल : मोहरीच्या तेलाने पाठदुखीपासून थोडासा आराम मिळतो. आंघोळ करण्यापूर्वी मोहरीचे तेल गरम करून कोमट करा, आता कंबरेला हलक्या हातांनी ५-१० मिनिटे मसाज करा. मग कोमट पाण्याने आंघोळ करा.
  • मोहरीच्या तेलात ओवा : पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलात ओवा टाकून गरम करा. तेल कोमट झाल्यावर कंबरेला लावून मसाज करा. 1 आठवडा असे केल्याने तुम्हाला फायदा होईल.
  • ऑलिव्ह तेल वापरा : पाठदुखीवरही ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे. यासाठी ऑलिव्ह ऑईल थोडे गरम करून कंबरेवर 10-15 मिनिटे हळू हळू मसाज करा. यामुळे वेदना निघून जातील.
  • मोहरीच्या तेलात लसूण : मोहरीच्या तेलात लसूण मिसळून मसाज केल्यासही फायदा होतो. यासाठी २ चमचे मोहरीचे तेल आणि २ लसणाच्या कळ्या घ्या. आता ते गरम करा, ते थोडे कोमट झाल्यावर, कंबरेला 10-15 मिनिटे मसाज करा, आता आंघोळ करा. याचा फायदा तुम्हाला मिळेल.
  • खोबरेल तेलात लसूण : खोबरेल तेलात लसूण मिसळून मसाज केल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. खोबरेल तेल प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते. त्यात लसणाच्या ४-५ पाकळ्या जाळून चांगल्या गरम करा, आता कोमट झाल्यावर पाठीला मालिश करा. यामुळे वेदना नाहीशा होतील, तसेच त्वचाही मुलायम होईल.
  • निलगिरी तेल : पाठदुखीवर निलगिरीचे तेल रामबाण उपाय आहे. ते हलके गरम करून कंबरेला लावल्याने काही मिनिटांत वेदना नाहीशा होतात.

हेही वाचा :

  1. Mushroom Benefits : वजन कमी करण्यासोबतच मशरूम ब्लडप्रेशरही नियंत्रित करते; जाणून घ्या त्याचे इतर फायदे
  2. Reusing Cooking Oil : तुम्हीही उरलेले तेल पुन्हा वापरता का ? तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक
  3. Magnesium in your diet : शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही महत्त्वाचे; आहारात करा मॅग्नेशियमचा समावेश...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.