ETV Bharat / sukhibhava

Aloe Vera for Hair : केस चमकदार ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा कोरफडीचा हेअर पॅक

author img

By

Published : Jul 19, 2023, 2:33 PM IST

बदलती जीवनशैली, चुकीचे खाणेपिणे, प्रदूषण इत्यादींमुळे लोक केसांशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत पण जर तुम्हाला तुमचे केस निरोगी आणि सुंदर ठेवायचे असतील तर तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. याच्या मदतीने तुम्ही घरी सहज हेअर पॅक बनवू शकता. जे तुमचे केस मुळापासून मजबूत करण्यास मदत करतात.

Aloe Vera for Hair
कोरफडीचा हेअर पॅक

हैदराबाद : आजकाल प्रत्येकालाच केसांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक महागड्या प्रोडक्टस् चा वापर करत आहेत. तुम्ही यापासून वाचण्यासाठी कोरफडीचा चांगला वापर करू शकता. कोरफडीमुळे केस मजबूत होतात. अँटिऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ कोरफडीत आहे. वेरा कोरफडीचे जेल कोंडापासून मुक्त होण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कोरपडीच्या जेल पासून तूम्ही घरच्या घरी हेअर पॅक बनवू शकता, कसा ते घ्या जाणून.

कोरफड आणि दहीचा हेअर पॅक : या हेअर पॅकचा वापर केल्याने तुमचे केस चमकदार आणि मजबूत होतील. दह्यात असलेले प्रोबायोटिक्स कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. हा हेअर पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा कोरफड जेल घ्या आणि त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा मध घाला. या मिश्रणात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. हे मिश्रण केस आणि टाळूवर लावा काही वेळाने पाण्याने धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.

  • कोरफड आणि खोबरेल तेल हेअर पॅक : हे हेअर पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल घ्या. त्यात दोन चमचे ताजे एलोवेरा जेल, एक चमचा मध घाला. केसांना मसाज करा आणि 30 मिनिटे राहू द्या. थोड्या वेळाने शॅम्पूने धुवा.
  • कोरफड आणि मेथीचा हेअर पॅक : कोरफड आणि मेथीचे दाणे केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. मेथी रात्रभर भिजवून केसांचा पॅक बनवा. दुसऱ्या दिवशी, मेथीचे दाणे मिसळून पेस्ट बनवा आणि त्यात 3 चमचे कोरफड जेल घाला आणि हे मिश्रण हेअर मास्क म्हणून लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर शैम्पूने धुवा. हे नियमितपणे लावल्याने केस मजबूत होतात.

हेही वाचा :

  1. Health Benefits of Amla : अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आवळा; जाणून घ्या त्याचे फायदे
  2. Bleeding gums : हिरड्यात रक्तस्त्राव? तुमच्यासाठी आहेत या टिप्स...
  3. Thyroid related problems : थायरॉईडचा त्रास कमी होण्याकरिता योगाभ्यास ठरू शकतो फायदेशीर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.