ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांडातील पीडिता अनंतात विलीन, दारोडा ग्रामस्थ गहिवरले

author img

By

Published : Feb 10, 2020, 12:30 PM IST

Updated : Feb 10, 2020, 7:56 PM IST

पीडितेच्या मृत्यूची बातमी हिंगणघाटमध्ये वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पीडितेच्या गावातील महिला आणि पुरूष रस्त्यावर उतरून आरोपीच्या फाशीची मागणी करत आहेत.

wardha
हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या मृत्यूनंतर लोकांचा संताप अनावर

वर्धा - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. पीडितेच्या मृत्यूची बातमी हिंगणघाटमध्ये वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पीडितेच्या गावातील महिला आणि पुरूष रस्त्यावर उतरून आरोपीच्या फाशीची मागणी करत आहेत.

UPDATE :

  • 4:10 PM - पीडिता अनंतात विलीन
    पीडिता अनंतात विलीन...
  • 4:08PM- पीडितेच्या वडिलांनी दिला मुखाग्नी
  • 4:30 PM अंत्ययात्रा मोक्षधाममध्ये पोहोचली
  • 4:15 PM- अंत्ययात्रेला सुरुवात, उपस्थितांना अश्रू अनावर
  • 4:10 PM-दारोडा गावात शोककळा
  • पीडित तरुणीचा मृतदेह दारोडा गावात
    LIVE : हिंगणघाट जळीतकांड; पीडितेचा मृतदेह घरी पोहोचला
  • हिंगणघाटच्या लेकीला अखेरचा निरोप
  • आरोपीला पीडितेप्रमाणेच जाळून मारण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी
  • वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्याकडून पीडितेच्या नातेवाईकांचे सांत्वन
  • जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचे शांतता राखण्याचे आवाहन
  • घटसावली गावाजवळ रस्ताही केला बंद
  • नागरिकांना नागपूर हैदराबाद महामार्ग रोखला
  • आंध्र प्रदेशच्या धरतीवर राज्यात कायदा आणणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • पुन्हा असं कृत्य करणार नाही असा कायदा आणणार
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे नागरिकांना आवाहन
  • घरात मृतदेहासोबत आत्ता फक्त जवळचे नातेवाईक
  • पीडितेचा मृतदेह घरी पोहोचला
  • पोलिसांचा नाईलाजाने जमावावर लाठीचार्ज
  • पोलिसांनी अन्य मार्गाने रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला
  • माध्यमाच्या प्रतिनिधींवरही दगडफेक
  • पोलिसांचा पुन्हा एकदा लाठीमार
  • मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या जमावाने काचा फोडल्या
  • पोलीस आणि माध्यमांवर नागरिकांची दगडफेक
  • पोलिसांचा जमावावर सौम्य लाठीचार्ज
  • दारोडा गावात नागरिकांच्या जमावाने मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अडवण्याचा प्रयत्न
  • संविधान चौकात नागरिकांची आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसह घोषणाबाजी
  • संविधान चौकात पीडितेचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिकेवर नागरिकांची पुष्पवृष्टी
    LIVE : हिंगणघाट जळीतकांड; संविधान चौकात पीडितेचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिकेवर नागरिकांची पुष्पवृष्टी
  • हिंगणघाटच्या संविधान चौकात नागरिकांचा रास्ता रोको
  • सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी 100 नागरिकांना स्थानबद्ध केले
    LIVE : हिंगणघाट जळीतकांड; पोलिसांनी 100 नागरिकांना केले स्थानबद्ध
  • मृत पीडितेची मावस बहिण गावात दाखल
    हिंगणघाट जळीतकांड LIVE: पीडितेची मावस बहिण गावात दाखल
  • पोलिसांनी लोकांना महामार्गावरून दूर केले
  • संतापलेल्या ग्रामस्थांचा आदिलाबाद-हैदराबाद महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
    हिंगणघाट जळीतकांड LIVE: पीडितेच्या मृत्यूनंतर नागरिकांचा महामार्ग अडवण्याचा प्रयत्न
  • आरोपीला फाशी देण्याची ग्रामस्थांची मागणी
    LIVE : हिंगणघाट जळीतकांड, आरोपीलाही जाळून मारण्याची पीडितेच्या वडिलांची मागणी
  • पुरूषांसह महिलाही रस्त्यावर
  • मृत्यूची बातमी समजताच पीडितेच्या दरोडा या गावी लोकांना संताप अनावर
  • पीडितेचा मृतदेह हिंगणघाटकडे रवाना
Intro:


Body:लोकांचा राग अनावर लोक रस्त्यावर उतरले महिला पुरुष यात सशभगी झाले आहे पोलीस प्रशासनाचे ऐकण्यास तयार नाही. आता आता पर्यंत शांत असलेले गाव आज मृत्यूच्या बातमी नंतर आरोपीला फाशी द्या मागणीसाठी पेटून उठले आहे.


Conclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.