ETV Bharat / state

वर्धा : कोरोनाच्या लढाईत रात्रंदिवस कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, आयएमएचा पुढाकार

author img

By

Published : Apr 25, 2020, 2:49 PM IST

कोरोनाशी लढा देताना पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्तव्यावर असताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती पाहता आयएमएच्या पुढाकाराने पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे.

corona virus medical checkup for police parsonel in wardha
कोरोनाच्या लढाईत रात्रंदिवस कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

वर्धा - पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून कोरोनाविरुद्ध लढ्यात सहभागी झाले आहेत. या परिस्थितीत कोरोनाशी लढा देताना त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्तव्यावर असताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे. आयएमएच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शहरातील रामनगर पोलीस ठाण्यामधून करण्यात आली.

कोरोनाच्या लढाईत रात्रंदिवस कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
कोरोनामुळे सर्वत्र पोलीस प्रशासन दिवस-रात्र काम करत आहे. यात कायद्याच्या चौकटीत राहून लोकांना घरात राहण्याचे अवाहन केले जात आहे. यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांना सोशल डिस्टसिंगसाठी मार्गगदर्शन असो की गुन्हेगारांना अटकाव करण्यासारखे जिकिरीचे काम असो ते पार पाडत आहेत. यावेळी कामाचा ताण, उन्हाचा तडाका यासह कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. ही सगळी परिस्थिती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशने घेतला आहे. यामध्ये पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासह कोरोनाच्या लढ्यात प्रतिकारशक्ती वाढावी. यासाठी विटामिन सी, झिंक या यासारखी औषधे दिली जाणार आहेत.
corona virus medical checkup for police parsonel in wardha
कोरोनाच्या लढाईत रात्रंदिवस कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
जिल्ह्यात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यासह होमगार्डची होणार आरोग्य तपासणी-
जिल्ह्यात साधारण 1,700 पोलीस कर्मचारी यासह 300 गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांचीही तपासणी केली जाणार आहे. यात रामनगर पोलीस स्टेशनच्या 90 जणांची तपासणी करण्यात आली. पुढील काही दिवसात इतर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पाच पोलीस ठाण्यांचा समावेश असणार असून सेवाग्राम शहर ठाणे, सावंगी मेघे पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात पाच दिवस ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय मोगरे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक यांनी गुन्हेगारांना पकडताना घेण्याची काळजी यासह दैनंदिन गुन्ह्याच्या तपासात काम करताना घेण्याची खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. यासह मास्क, हॅंडग्लोज वापरण्याचे आवाहन केले. कुठलेही साहित्य लागल्यास त्याची मागणी करावी असेही रामनगरचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांना सूचना पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिल्या आहेत.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलिस निरीक्षक धनाजी जळक, यामध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ संजय मोगरे, डॉ. तेजश्री सरोदे, विवेक चकोले, स्वरूपा चकोले, स्वप्निल तळवेकर, अमरदीप शानु, मोना सुने, सचिन तोटे, दर्शना तोटे यासह आयएमचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.