ETV Bharat / state

Budget 2023: अर्थसंकल्पात वर्ध्याला विशेष मदत, गावकऱ्यांनी मानले आभार

author img

By

Published : Mar 11, 2023, 2:56 PM IST

राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला आहे. या बजेटमध्ये त्यांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यावर विशेष भर देत भरघोस निधी देण्याचे कबूल केले आहे. तालुक्यामध्ये विष्णू यागावी तसेच आष्टी शहरातील क्रांतीसळाला तसेच तळेगाव येथील जंगल सत्याग्रहाच्या चळवळीला अजरामर करण्यासाठी भरगोस निधी देणार असल्याचे जाहीर केले. तसेच कारण वर्धा जिल्ह्यातील एकमेव असे असलेले महानुभव पंथांचे तीर्थस्थान भिष्णूर या गावी आहे.

Budget 2023
अर्थसंकल्पात वर्ध्याला विशेष मदत

अर्थसंकल्पात वर्ध्याला विशेष मदत

वर्धा: भिष्णूर हे गाव वर्धा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरती आहे. तळेगाव श्यामजीपंत येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाला हे पवित्र स्थळ आहे. या गावाची महिमा म्हणजे भिष्णुर या गावी महानुभव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेले गोविंद प्रभू हे तीन दिवस थांबले, असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने भीष्णुर या गावातील या तीर्थस्थळाला विकसित करण्यासाठी भरघोस निधी देण्याचे कबूल केल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता या तीर्थस्थळाला अधिक वेगळी ओळख निर्माण होईल यात काही शंका नाही असे गावकरी यांनी सांगितले.

तीर्थस्थळाला निधी उपलब्ध: गेल्या काही दिवसा अगोदर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखडे यांनी आर्वी विधानसभा क्षेत्राचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी भिष्णुर गावाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर या तीर्थस्थळाचा विकास व्हावा यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. त्या मागणीला साद देत सुमित वानखडे यांनी राज्य सरकारपर्यंत गावकऱ्यांची ही मागणी पोहोचवून त्यांना न्याय देण्याचे काम केले. इतक्या कमी वेळात तात्काळ परिस्थितीमध्ये तीर्थस्थळाला निधी उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने गावाला विकासाच्या दृष्टीने चालना दिली. या बजेटमध्ये वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात निधी जाहीर करण्यात आला. त्यामुळे आष्टी तालुक्यातील नागरिकांनी सरकारचे आभार मानले आहे.


सत्याग्रहाची आठवण: आष्टी येथे 1942 साली स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य स्मृतिस्थळ उभारण्यात येणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविले त्यानंतर आष्टी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत या ठिकाणी असलेल्या सत्याग्रही घाटामध्ये जी चळवळ राबविण्यात आली होती. त्या चळवळीला जंगल सत्याग्रह असे नाव देण्यात आले होते. त्या जंगल सत्याग्रहाची आठवण तेवत राहावी यासाठी त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह स्मारक तयार करण्याचे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर या सर्व भागातील नागरिकांनी सरकारचे विशेष आभार मानले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आष्टी तालुका हा विकास कामाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर राहील यात शंका नाही.

हेही वाचा: Marathi Sahitya Sammelan नव्या शिक्षण नितीतून मराठी ज्ञान व्यवहाराची भाषा होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.