ETV Bharat / state

Thane Rain Update: तानसा धरण ओव्हरफ्लो, सात दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Jul 26, 2023, 12:17 PM IST

Updated : Jul 26, 2023, 12:48 PM IST

मुंबईसह उपनगरांमध्ये ठाणे, पालघर या भागात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्याचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Thane Rain Update
तानसा धरण

तानसा धरण पूर्णपणे भरले

ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरण पूर्ण भरले आहे. धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले असून 7700 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


पिसा धरण ओव्हरफ्लो : ठाणे, भिवंडी व मुंबई महानगरपालिकेचे उदंचन केंद्र असलेले पिसा धरण गेल्या आठवड्यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे. भातसा धरणाच्या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. शहापूर व भिवंडी ग्रामीण भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे गेल्या आठ दिवसापासून पिसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 16 जुलै रोजी धरण ओव्हरफ्लो झाले होते.



पावसाला उशिरा सुरुवात : दुसरीकडे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आजच्या घडीला 70.30 टक्के पाणीसाठा आहे. धरण परिसरात दिवसाला 30 मिमीच्या आसपास पावसाची नोंद होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा शिल्लक आहे, तरी पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने व पाण्याची मागणी कमी झाल्याने ठाणे जिल्ह्यात लागू केलेली पाणी कपात लघु पाठबंधारे विभागाने रद्द केली आहे. धरण भागात जर पाऊस असाच पडत राहील्यास ऑगस्टमध्ये बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा धरणाच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 11 ऑगस्टच्या आसपास बारवी धरण ओव्हरफ्लो झाले होते.


पावसाचा जोर : दरम्यान, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा, विहार, तुळशी हे धरण ओव्हरफ्लो झाले. तर मध्य वैतरणा आणि मोडकसागर ही दोन धरणेही येत्या काही दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही धरणेही ओव्हरफ्लो होतील, असे पावसाच्या अंदाजावरून सांगण्यात आले. तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरणही तीन दिवसापूर्वीच ओव्हरफ्लो झाल्याने अंबरनाथ शहरातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.


हेही वाचा :

  1. Kolhapur Rain Update: राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीत विसर्ग सुरू; पंचगंगेची पाणी पातळी वाढणार
  2. Kolhapur Rain Update: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
  3. Drought In Beed District: बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती; शेतकरी चिंतेत
Last Updated : Jul 26, 2023, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.