ETV Bharat / state

बापाची निर्घृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

author img

By

Published : Dec 31, 2020, 5:55 PM IST

Updated : Dec 31, 2020, 6:16 PM IST

ठाणे
ठाणे

आरोपी सुरेश धर्मा धिंडा याला मृत वडील धर्मा शंकर धिंडा यांनी १७ डिसेंबर २०१७ रोजी शेतात काम करण्यास सांगून शिवीगाळ केली होती. याच रागातून आरोपी सुरेशने घरात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने बापावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ठाणे - ७० वर्षीय बापाची निर्घृण हत्या करणाऱ्या मुलाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश आर. एम. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सुरेश धर्मा धिंडा (वय ५३) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पेंढारीपाडा-बामणगाव येथे १७ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती.

शेतात काम करण्याच्या वादातून हत्या

आरोपी सुरेश धर्मा धिंडा याला मृत वडील धर्मा शंकर धिंडा यांनी १७ डिसेंबर २०१७ रोजी शेतात काम करण्यास सांगून शिवीगाळ केली होती. याच रागातून आरोपी सुरेशने घरात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने बापावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यांनतर सुरेश पोलिसांच्या भीतीने घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता एका गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला पाली गावातील एका मासेमारी बोटीवरून अटक केले होते.

पोलिसांनी न्यायालयात सादर केले सबळ पुरावे

या गुन्ह्यात भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय राजीव पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपी सुरेशला अटक केली होती. आज हत्येप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन वयोवृद्ध बापाची निर्घृण हत्या केल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहळकर यांनी युक्तीवाद केला. तर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय राजीव पाटील, सा. पोलीस उपनिरीक्षक राजपूत, तोरणे, पोलीस नाईक भरत शेगर, राजेंद्र शेंद्रे, कैलास वाढविंदे, आणि जयेश मुकादम या पोलीस पथकाने वेळोवेळी सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली.

Last Updated :Dec 31, 2020, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.