ETV Bharat / state

विधवा मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून, वयोवृद्ध आरोपी गजाआड

author img

By

Published : Jan 22, 2020, 6:31 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:03 PM IST

ठाण्यातील बदलापूर येथे एका वयोवृद्धाने २६ वर्षीय तरुणाचा खून केला. विधवा मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याचे समोर आले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

badlapur murdered case
विधवा मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयातून भरचौकात तरुणाचा खून

ठाणे - आपल्या विधवा मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबधाच्या संशयातून भर चौकात ६७ वर्षाच्या वडिलांनी एका २६ वर्षीय तरुणाची धारदार चाकूने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्वेकडील सुरवळ चौकात घडली. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून वयोवृद्ध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

विधवा मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून

सचिन शिंदे (वय, २६), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बदलापूर पूर्व परिसरातील सुरवळ चौकात आरोपी कुटुंबासह राहतो. तीन वर्षांपूर्वी आरोपीच्या जावयाचे निधन झाले होते. त्यामुळे मुलगी त्यांच्याकडेच राहत आहे. या दरम्यान सचिनसोबत तिची ओळख झाली होती. या ओळखीतून ते फेसबुकवर बोलत होते. काही दिवसांपूर्वीच आरोपीने मुलीला सचिनसोबत बोलताना पहिले होते. यामुळे मुलीला तिच्या वडिलांनी विरोधही केला असल्याची माहिती समोर आली आहे.

सचिन हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हे प्रकरण यापूर्वीच गेले होते. मात्र, तरीदेखील सचिन आरोपीच्या मुलीला त्रास देत होता. अखेर मलीच्या वडिलांना सचिन आणि मुलीच्या प्रेमसंबधाचा संशय निर्माण झाला. त्यातच बुधवारी दुपारच्या सुमारास बदलापुरातील सुरवळ चौकात सचिन आल्याची माहिती मिळताच आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार करून सचिनचा खून केला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात सलग दोन हत्या झाल्याने बदलापूर शहर हादरले आहे.

Intro:kit 319Body: विधवा मुलीवर प्रेमसंबधाच्या संशयातून भर चौकात तरुणाचा खून; वयोवृद्ध आरोपी गजाआड

ठाणे : आपल्या विधवा मुली सोबत असलेल्या प्रेमसंबधाच्या संशयातून भर चौकात ६७ वर्षाच्या वडिलांनी एका २६ वर्षीय तरुणाचा धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.
ही घटना बदलापूर पूर्वेकडील सुरवळ चौकात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून वयोवृद्ध आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन शिंदे (वय, २६)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नामदेव कोइंडे ( वय, ६७) असे पोलिसांनी खूनाच्या गुन्हयात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिवसाढवळ्या भर चौकात सचिनचा निर्घृण खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
बदलापूर पूर्व परिसरात सुरवळ चौकात आरोपी नामदेव कोइंडे हे कुटूंबासह राहतात. तीन वर्षांपूर्वी आरोपीच्या मुलीच्या पतीचे ३ निधन झाले होते. त्यामुळे मुलगी त्यांच्याकडे राहण्यास होती. या दरम्यान मृत सचिन सोबत तिची ओळख झाली होती. या ओळखीतून ते फेसबुकवर चॉटिंग करीत होते. काही दिवसापूर्वीच आरोपीने मुलीला मृत सचिन सोबत बोलताना पहिले होते. यामुळे मुलीला आरोपीने विरोधही केला असल्याचे समोर आले आहे. तर मृतक . सचिन हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हे प्रकरण यापूर्वी गेले होते. मात्र तरीदेखील मृत सचिन हा आपल्या मुलीला त्रास देत होता. अखेर वडील नामदेव यांना सचिन आणि मुलीच्या प्रेमसंबधाचा संशय निर्माण झाला होता. त्यातच आज दुपारच्या सुमारास बदलापुरातील सुरवळ चौकात सचिन आल्याची माहिती मिळताच आरोपी नामदेव यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा करीत सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसात उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात सलग दोन हत्या झाल्याने बदलापूर शहर हादरले आहे.
byte -विनायक नरळे(सहाय्यक पोलीस आयुक्त )

Conclusion:mardar bdlalpur
Last Updated : Jan 22, 2020, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.