ETV Bharat / state

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीने एसटी कामगारांचे शोषण केले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

author img

By

Published : Apr 11, 2022, 9:54 PM IST

महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले ( Prakash Ambedkar Allegation Mahavakas Aghadi ) आहे. आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

ठाणे - महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले ( Prakash Ambedkar Allegation Mahavakas Aghadi ) आहे. कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून, याचा आम्ही निषेध करतो. मात्र, एसटी कामगारांची न्यायालयात ज्या पद्धतीने बाजू मांडायला पाहिजे होती तशी बाजू मांडली गेली नाही. न्यायालयाने कामावर रुजू होण्याची एक संधी दिली आहे. त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात केले होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. पण, तेव्हाच भूमिका आम्ही मांडली होती की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका. आता न्यायालयाने संधी दिली आहे. उर्वरित प्रश्ननंतर सोडवता येतील. मात्र, आता कामावर रुजू होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

शिवनेरी मार्फत खाजगीकरण - या आधी एसटी प्रशासनाने जेव्हा शिवनेरीच्या मार्फत खाजगीकरण केले. तेव्हाच लढा द्यायला हवा होता. संपाबाबत जर न्यायालयात योग्य बाजू मांडली असती, तर जेवढे अभय दिले आहे. आणखी अभय मिळाले असते, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सदावर्तेवर टीका - वकिलांनी केवळ कोर्टात आपली बाजू मांडायची असते. रस्त्यावर बाजू मांडायची नसते. नेते आणि वकील आशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नसल्याची टीका आंबेडकरांनी सदावर्तेवर केली आहे.

राज ठाकरेंना सभेनंतर 'उत्तर' देणार - गुडीपाडवा सभेत राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत सांगून जे राजकारण सुरू आहे. त्याबाबात राज ठाकरेंच्या सभेनंतर उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

...म्हणून दंगली घडवल्या जात आहेत - मनमोहन सिंग यांच्या काळात एवढी महागाई वाढली नव्हती. पेट्रोल डिझेलचे दरही 80 रुपयांच्या वर गेले नव्हते. मात्र, आजच्या घडीला महागाई बोकाळली असून, त्यामुळेच हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जात असल्याचा आम्हाला संशय आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya Bail Rejected : किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.