ETV Bharat / state

Gun Firing In Bullock Cart Race : अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात अंधाधुंद गोळीबार

author img

By

Published : Nov 13, 2022, 8:22 PM IST

अंबरनाथ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीच्या वादातून (bullock cart race dispute Ambarnath Thane) दोन गटात अंधाधुंद गोळीबार (Gun firing between two groups) झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अंधाधुंद गोळीबाराचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद (bullock cart race dispute Gun firing Video) झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. latest news from Thane, Thane Crime, Gun Firing In Bullock Cart Race

Gun Firing In Bullock Cart Race
गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीच्या वादातून (bullock cart race dispute Ambarnath Thane) दोन गटात अंधाधुंद गोळीबार (Gun firing between two groups) झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अंधाधुंद गोळीबाराचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद (bullock cart race dispute Gun firing Video) झाला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. latest news from Thane, Thane Crime, Gun Firing In Bullock Cart Race

गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

शर्यतीचा खेळ गेला टोकाला- न्यायालयाच्या अटी आणि शर्तीनुसार पुन्हा बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्हातील बहुतांश गावात शर्तीचे आयोजन कऱण्यात येत आहे. आज अंबरनाथ पूर्वेकडील एका गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पनवेलमधील पंढरीशेठ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्याही बैलगाडा शर्यतीत सहभागी घेतला. मात्र आज सायंकाळच्या सुमारास पनवेलमधील पंढरीशेठ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यातील वाद बैलगाडा शर्यतीत टोकाला गेला.

शर्यत पडली बाजूला, रंगला गोळीबाराचा थरार - त्यावेळी दोन्ही गटाकडून अचानक अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत राहुल पाटील यांच्या कारची समोरील काच फुटली असून सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. मात्र अंदाधूंद गोळीबारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी सध्या पोलीस पंचनामा करीत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.