ETV Bharat / state

Truck Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; पाच ठार तर सहा गंभीर

author img

By

Published : Nov 28, 2021, 11:58 AM IST

उजनी धरणानजीक भीमा नदी पुलावर रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन एकेरी वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. मळीने भरलेला टँकर (एमएच 14 सीपी 4020), तांदूळ असलेला ट्रक (एमएच 25/4045) भीमानगर येथील सरदारजी ढाब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

Truck Accident
ट्रकचा भीषण अपघात

पंढरपूर (सोलापूर ) - उजनी धरणा जवळील भीमानगर येथे ट्रक आणि टँकरचा भीषण ( Truck Accident ) अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसून आले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ( Solapur-Pune Highway ) या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना इंदापूर येथील ग्रामीण रुग्णालयात ( Indapur Rural Hospital ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत्यू व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही.

Truck Accident
ट्रकचा भीषण अपघात

समोरासमोर धडक -

उजनी धरणानजीक ( Ujani dam ) भीमा नदी पुलावर रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन एकेरी वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. मळीने भरलेला टँकर (एमएच 14 सीपी 4020), तांदूळ असलेला ट्रक (एमएच 25/4045) भीमानगर ( Bheemanagar ) येथील सरदारजी ढाब्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. सोलापूर पुणे महामार्गावर शनिवारी उशीरा रात्री मळीने भरलेला ट्रक प्रवास करत होता. हा ट्रक इंदापूरच्या दिशेने निघाला होता. दुसऱ्या बाजूला तांदळाने भरलेला एक ट्रक सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. या भयंकर अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. सहा जण गंभीर जखमी झाले असून, जखमींवर इंदापूरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे आगोदरच एकेरी सुरु असलेली वाहतूक दोन तासांसाठी ठप्प झाली. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर जवळपास दीड किलोमीटर अंतरारापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

Truck Accident
ट्रकचा भीषण अपघात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.