ETV Bharat / state

Workers Clash : काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : Aug 20, 2023, 5:41 PM IST

Updated : Aug 20, 2023, 7:59 PM IST

सोलापूर काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात कार्यकर्ते एकत्र आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची देखील उपस्थिती होती. आमदार शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यावरून हाणामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे.

Congress Workers Clash
Congress Workers Clash

काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा राडा

सोलापूर : काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने सोलापुरातील काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस भवनात अशा घटना नवीन नाहीत. यापूर्वीही हाणामारी, शिवीगाळ झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रविवारी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दरम्यान हा वाद झाला. सध्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काँग्रेस कमिटीचे स्थानिक नेते या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत होते, मात्र, या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली.

'या' कारणामुळे झाली हाणामारी : रविवार 20 ऑगस्ट रोजी सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी काँग्रेस भवनात जमले होते. अभिवादन करून आमदार प्रणिती शिंदे बाहेर आल्या, तेव्हा फोटो काढण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या शाब्दिक चकमकीचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. याबाबत अधिक माहिती घेतली असता, काँग्रेसचे कार्यकर्ते सुशील बंदपट्टे, सुभाष वाघमारे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर या प्रकरणाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे दिसून आले.

आमदार प्रणिती शिंदेंची कार्यकर्त्यांना तंबी : फोटो सेशनवरून काँग्रेस पक्षात अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. महिला कार्यकर्त्यांमध्ये फोटोत दिसण्यासाठी प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे फोटो काढण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आज राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात हाणामारी झाल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिल्याची माहिती आहे.

काँग्रेस भवनात नेहमी होतात अशा घटना : यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी वाद मिटवला. यापूर्वी 2016 मध्ये काँग्रेस भवनमध्ये NSUI काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अशीच एक घटना घडली होती. त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. फेब्रुवारी २०२३ मध्येही देवा गायकवाड, अनिल म्हस्के यांच्यात वाद झाला होता.

हेही वाचा -

  1. Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे वादग्रस्त विधान; हिंदू महासंघ आक्रमक
  2. Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं खुशाल कोर्टात जा, मी वकील देतो; संजय राऊतांचा टोला
Last Updated : Aug 20, 2023, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.