ETV Bharat / state

उजनीच्या पाण्यासाठी रक्त सांडू, पण पाणी जाऊ देणार नाही

author img

By

Published : May 18, 2021, 10:28 AM IST

Updated : May 18, 2021, 12:22 PM IST

उजनी धरणामधील 5 टीएमसी पाणी इंदापूर(पुणे) तालुक्यातील 23 गावांना मिळणार आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यात राजकारण तापले आहे. याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि इतर राजकीय पक्ष देखील एकवटले आहेत.

uttamprakash khandare
उत्तमप्रकाश खंदारे

सोलापूर- सध्या उजनीच्या पाण्यावरून राजकारण पेटले आहे. पाण्यावरून इंदापूर आणि सोलापूरमधील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते, शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते हे उजनी पाणी प्रश्नावरून पालकमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे माजी आमदार व माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनीदेखील उजनी धरणातील एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही त्यासाठी रक्त सांडू अशी टोकाची भूमिका घेतली आहे.

उजनीच्या पाण्यासाठी रक्त सांडू, पण पाणी जाऊ देणार नाही
उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 23 मिळणारउजनी धरणामधील 5 टीएमसी पाणी इंदापूर(पुणे) तालुक्यातील 23 गावांना मिळणार आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यात राजकारण तापले आहे. याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि इतर राजकीय पक्ष देखील एकवटले आहेत. पूणे येथे सिंचन भवनमध्ये झालेल्या बैठकीत सोलापूरचे शेतकरी आणि इंदापूर येथील शेतकरी यांमध्ये खडाजंगी उडाली होती. पूणे शहराची पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे खडवासला धारणामधून इंदापूर तालुक्याला योग्य तितके पाणी मिळत नाही. त्यामुळे केवळ पूणे येथून येणाऱ्या सांडव्यातुन पाणी उचलणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी राखीव असलेल्या उजनी धरणामधून पाणी उचलणार नाही, अशी माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली होती. इंदापूर तालुक्याचा सिंचन क्षेत्र नेमकं किती आहे?इंदापूर तालुक्याला खडकवासला धरणातून पाणी मिळते. डायनॅमिक डेअरीला उजनीतूनच पाणी घेऊन जाता. लिंबोडी काडी योजनेला उजनीच्या बॅक वाटर मधून 7 ते 8 टीएमसी पाणी इंदापूरला घेऊन जाता. इंदापूरला नीरा भाटगरचे पाणी आहे. एका तालुक्याला इतके कसं काय पाणी लागते. उजनी धरणाचं मागील बॅक वाटर भाग हा गायरान आहे का? अशी टीका खंदारे यांनी पालकमंत्र्यांवर केली. उजनी धरणाचे पाणी हे कुठेही जाऊ देणार नाही. वेळ पडली तर उजनीच्या पाण्यासाठी रक्त सांडू, अशी टोकाची भूमिका घेऊ असेही खंदारे म्हणाले.
Last Updated : May 18, 2021, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.