ETV Bharat / state

love relationship break up : प्रेम संबंध तोडल्याने विवाहित महिलेने पुण्यातून केले तरुणाचे अपहरण

author img

By

Published : Jun 28, 2023, 3:03 PM IST

प्रेम प्रकरणातून एका विवाहितेने चक्क एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सोलापूरमधील तरुणाचे गुजरातमधील विवाहित महिलेशी प्रेम संबंध जुळले होते. परंतु लग्न ठरल्यामुळे तरुणाने विवाहितेशी ब्रेकअप केले. या बेक्रअपचा राग मनात घरात तिने त्या तरुणाचे अपहरण केले.

पुण्यातून  तरुणाचे अपहरण
पुण्यातून तरुणाचे अपहरण

पुण्यातून तरुणाचे अपहरण

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यात काही गुन्हे असे घडतात की ते ऐकून पोलीसही चक्रवत असतात. आजपर्यंत आपण प्रेम प्रकरणात मुलाकडून मुलीचे अपहरण करण्यात आल्याच्या घटना पाहिली आहे. पण पुण्यातील कोंढवा धावडे येथे वेगळा प्रकार समोर आला आहे. चक्क एका विवाहितेने प्रेम प्रकरणातून एका 28 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला गुजरातमधील वापी येथे नेले असल्याची घटना समोर आली आहे.

आरोपींना अटक : दरम्यान उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापी येथे जाऊन त्या तरुणाची सुटका केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी त्या विवाहितेसह दोन तरुणांना अटक केले आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय 21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय 26, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

कुठून झाले अपहरण : अपहरण झालेला तरुण हा मूळ सोलापूरचा आहे. त्याचा भाऊ पुण्यातील एनडीए रस्ता परिसरात राहत असतो. हा तरुण गुजरातमध्ये कंपनीत नोकरीला होता. परंतु घरच्यांनी त्याला घरी बोलवल्यानंतर तो परत सोलापूरला आला काही दिवस सोलापूरला राहिल्यानंतर तो परत पुण्यात आपल्या भावाकडे गेला. पुण्यातील कोढवे धावडे परिसरातून या तरुणाचे अपहरण करत त्याला वापीमध्ये एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते.

ब्रेकअप केल्याने अपहरण : मूळ सोलापूरचा असलेला 23 वर्षीय तरुण गुजरातमधील वापी या ठिकाणी एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. तेथे राहत असताना त्याचे एका २८ वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. परंतु या तरुणाचे लग्न त्यांच्या घरच्यांनी दुसरीकडे जुळवले होते, त्यामुळे त्याने त्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध तोडले. लग्न जुळवल्यामुळे त्या तरुणाच्या घरच्यांनी त्याला घरी सोलापूरला परत बोलवले. घरच्यांनी बोलवल्यामुळे तो तरुण नोकरी सोडून सोलापूरला गेला. काही दिवस घरी राहिल्यानंतर तो पुण्यात भावाकडे राहू लागला होता. आपल्याशी असलेले प्रेमसंबंध तोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करत असल्याचा राग मनात धरत वापीमधील महिलेने तरुणाच्या अपहरणाचा प्लान केला. या कामासाठी तिने प्रोफेशनल अपहरणकर्त्यांना यासाठी पैसे दिले. या तरुणाचा एनडीए रस्ता परिसरातील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या साथीदारांनी त्या तरुणाचे अपहरण केले.

भावाने केली तक्रार : एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण झाल्यानंतर त्याचा भाऊ यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तरुणाचे जेथून अपहरण झाले होते तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात त्यांना अपहरणकर्त्यांची कार दिसली. पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी वापी येथे एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली.

हेही वाचा -

Pune Crime News: कामाचे पैसे मागितले म्हणून पुण्यात 'या' भाजप नेत्याच्या पुतण्याकडून लेबर कॉन्ट्रॅक्टरला जबर मारहाण

Ahmednagar Crime News: धक्कादायक! पाथर्डी येथील एकाच विहिरीत आढळले चार मृतदेह; मृतांमध्ये आईसह तीन मुलांचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.