ETV Bharat / state

दत्तात्रय भरणेंनी उजनीचे पाणी चोरल्याचा आरोप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धरणात जलसमाधी आंदोलन

author img

By

Published : May 1, 2021, 9:15 PM IST

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी चोरल्याचा आरोप उजनी बचाव पाणी संघर्ष समितीने केला आहे. त्यामुळे आज उजनी धरणात भरणे यांच्या निषेधार्थ जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

solapur
सोलापूर

सोलापूर - उजनी बचाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने 5 टीएमसी पाणी चोरीच्या निषेधार्थ महाराष्ट्र दिनी (1 मे) उजनी धरणामध्ये जल आंदोलन करण्यात आले. इंदापूर तालुक्याला उजनीतून 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाविरोधात पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. सोलापुरात कोरोना महामारीने थैमान मांडले असताना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानी आपल्या मतदारसंघासाठी 5 टीएमसी पाणी वळवल्यामुळे सर्वस्तरातून पालकमंत्र्याचा विरोध केला जात आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उजनी धरणात आंदोलन

पोलिसांना चकवा देत आंदोलक पोहोचले धरणात

उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निषेधार्थ उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने उजनी धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त केला होता. आंदोलकांची धरपकड केली. पण छुप्या मार्गाने आंदोलकांनी उजनी धरणात येऊन पालकमंत्र्याच्या विरोधात जलसमाधी आंदोलन केले. धरण प्रवण क्षेत्रामध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र, त्याला न जुमानता जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळनवर आणि पाणी बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल खूपसे आदींसह कार्यकर्त्यांनी धरण क्षेत्रातील पाण्यामध्ये जल आंदोलन केले.

'उजनीच्या पाणी प्रश्नाचा आवाज विधानसभेत उचलणार'

'उजनीचे पाणी हे सोलापूरच्या हक्काचे आहे. हक्काचे पाणी जर इंदापूरकडे जात असेल तर आपण गप्प बसणार नाही. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे', असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले. तसेच 'पालकमंत्र्याना सोलापुरात येऊ देणार नाही', असा इशारादेखील सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

हेही वाचा - 'लस सुरूवातीला परदेशात देण्याची काहीच गरज नव्हती'

हेही वाचा - कल्याणच्या रेल्वे यार्डातील केबलच्या गोदामाला आग, वेळीच नियंत्रण मिळवल्याने टळली मोठी दुर्घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.