ETV Bharat / state

तपासणीस येणाऱ्या पथकाला खरी माहिती द्यावी - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

author img

By

Published : Sep 19, 2020, 5:43 PM IST

मौजे चिखली (ता.मोहोळ) येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव, शहर तसेच जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लागेल, असे आमदार यशवंत माने यांनी यावेळी सांगितले.

guardian minister dattatray bharne appeal to citizen give truth information to survey officers
पालकमंत्री दत्तात्रय भरणे

पंढरपूर (सोलापूर) - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहीमेतंर्गत शहर, गाव, वस्ती यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना आरोग्य बाबतचे शिक्षण देण्यात आहे. आपण स्वत: आपले व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. जेणे करुन आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होणार नाही. त्यासाठी तोंडाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनावा संसर्ग रोखण्यासाठी या माहीमेत लोकसहभाग महत्वाचा असून सर्व नागरिकांनी या मोहीमेतंर्गत आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आरोग्य पथकास सहकार्य करावे असे, आवाहनही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी केले.

मौजे चिखली (ता.मोहोळ) येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार यशवंत माने, सरपंच इंदूबाई वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, नायब तहसिलदार राजशेखर लिंबारे, तालुका आरोग्य अधिकारी अरुण पाथरुटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव, शहर तसेच जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लागेल, असे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी यावेळी दिली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.