ETV Bharat / state

शेतकरी आंदोलन : मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना वाहिली श्रद्धांजली

author img

By

Published : Dec 21, 2020, 5:22 AM IST

aam aadmi party and cpm Party worker pay tribute to deceased farmers protesters
शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना वाहिली श्रद्धांजली

शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना माकप आणि आम आदमी पार्टीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भारतीय किसान संघाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला.

सोलापूर - मागील 25 दिवसापासून शेतकरी, आंदोलनाच्या लढ्याच्या मैदानात अविरतपणे उरतलेला आहे. सरकारने आंदोलनावर दडपशाही चालवली आहे. यात तब्बल 20 हून शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. तसेच संत बाबा राम सिंग यांनी आत्मआहुती दिली. त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून 5 हजार शेतकरी दिल्लीकडे आगेकूच झालेले आहेत, असे सिटूचे राज्य सचिव युसूफ शेख यांनी सांगितले. आम आदमी पार्टीच्या वतीनेदेखील मौन धारणा करत आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि भारतीय किसान संघाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला.

भारतीय किसान संघाचा निषेध
रविवारी (ता. 20) सांयकाळी 6 वाजता चार हुतात्मा पुतळा येथे माकपच्या वतीने आणि आम आदमी पार्टीच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दोन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा घोषित केला. भारतीय किसान संघ या शेतकरी संघटनेने कृषी कायद्याला समर्थन देत, दिल्ली शेतकरी आंदोलनाची घोर चेष्टा करत असल्याचा आरोप करत, त्यांचा आम आदमी आणि माकपने निषेध केला.

युसूफ शेख बोलताना...
5 हजार शेतकरींची दिल्लीकडे कूच
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 5 हजार शेतकरी हे दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती यावेळी माकप नेते युसूफ शेख यांनी दिली. नरेंद्र मोदी हे अंबानीना भेटण्यासाठी वेळ काढतात. पंरतु शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ काढत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी माकपचे नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सलीम मुल्ला, अशोक बल्ला, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, बापू साबळे, नरेश दुगाणे, दाऊद शेख, जावेद सगरी, शंकर म्हेत्रे, अकिल शेख, बाबू कोकणे, किशोर मेहता, आसिफ पठाण,विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्ल्याळ मल्लेशाम कारमपूरी आणि आम आदमी पार्टीच्या वतीने अस्लम शेख, रॉबर्ट गौडर, सागर पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अभिवादन करून मौन धारण करून मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.