ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case : नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम, कोर्ट आज देणार निकाल

author img

By

Published : Dec 29, 2021, 9:22 PM IST

Updated : Dec 30, 2021, 12:38 AM IST

संतोष परब हल्ल्यातील (Santosh Parab Attack Case) आरोपी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) व गोट्या सावंत (Gotya Sawant) यांच्या अटकपूर्व जामिनावर 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले.

court
court

सिंधुदुर्ग - संतोष परब हल्ल्यातील (Santosh Parab Attack Case) आरोपी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) व गोट्या सावंत (Gotya Sawant) यांच्या अटकपूर्व जामिनावर 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी सांगितले. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळतो की नाही हे गुरुवारी ठरणार आहे.

  • 30 डिसेंबरला होणार निर्णय -

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आममदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अ‍ॅड . राजेंद्र रावराणे आणि अ‍ॅड संग्राम देसाई यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंबर रोजी झाली होती. यानंतर उर्वरित सुनावणी 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर रोजी झाली आहे. आता यावरचा निर्णय 30 डिसेंबरला दिला जाणार आहे. आयपीसी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात आम. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की त्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार हे चित्र गुरुवारी 30 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

माहिती देताना वकील
  • सरकारी वकील घरत यांनी केला युक्तिवाद -

आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर 28 डिसेंबर रोजी सायंकाळी उशीरापर्यंत नितेश राणे, गोट्या सावंत यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.तर 29 डिसेंबरच्या दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात आ. नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत 30 डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले.

  • नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न - अ‍ॅड. संग्राम देसाई

    संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे. तक्रारदार संतोष परब यांनी आपल्या तक्रारीमध्ये आरोपींनी आपल्यावर हल्ला केल्यानंतर नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना फोन करा असे म्हटले असल्याचे नोंदविले आहे. यावरून ही बाब संशयास्पद असल्याचे दिसून येते. कारण फिर्यादीवर हल्ला झाल्यानंतर सहा तास उलटून गेल्यावर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. यावर आपण कोर्टात आक्षेप घेतल्याचे ते म्हणाले.
  • कोर्टाला अभ्यास करायला वेळ द्यायला हवा- सरकारी वकील घरत

यावेळी बोलताना सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, आमचा युक्तिवाद संपला आहे. आता दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आहे. याबाबत कोर्टाला अभ्यास करायला थोडा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे यासंदर्भातला निकाल 30 डिसेंबर रोजी येण्याची शक्यता आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Last Updated : Dec 30, 2021, 12:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.