ETV Bharat / state

Satara Riots : साताऱ्यातील दंगलीप्रकरणी २३ संशयित ताब्यात; इंटरनेट सेवा मात्र बंदच

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 10:56 PM IST

Satara Riots : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टच्या वादातून साताऱ्यातील पूसेसावळी गावात रविवारी रात्री दंगली उसळली होती. यात 10 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता सातारा पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, आतापर्यंत पोलीसांनी २३ संशयितांना ताब्यात घेतलंय. यामुळे जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.

साताऱ्यातील दंगलीप्रकरणी २३ संशयित ताब्यात
Satara Riots

सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक

सातारा Satara Riots : साताऱ्यातील पुसेसावळी गावात झालेल्या दंगली प्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट आणि हत्या केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर सातारा पोलीस ॲक्शन मोडवर आले असून याप्रकरणी आतापर्यंत २३ संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा अद्यापही बंदच असून, जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. (Satara Police)

दोन स्वतंत्र गुन्हे दाखल : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टच्या वादातून साताऱ्यातील पूसेसावळी गावात रविवारी रात्री उसळलेल्या दंगलीत वाहने, घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली होती. यावेळी दगडफेकही करण्यात आली होती. यात १० जण जखमी झाले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून २३ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलीय. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा मात्र अजूनही बंदच आहे. पुसेसावळीतील दंगली प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच दंगलीत झालेल्या मारहाण, दगडफेकीत एकाचा मृत्यू झाल्यानं खुनाचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये पोलीसांनी आतापर्यंत २३ संशयितांना ताब्यात घेतलं असून, पुढील कारवाई सुरू असल्याचं सुनील फुलारी यांनी सांगितलंय.

जिल्हातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनास सहकार्य करावं. - विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी



नेमकं काय घडलं : दंगली संदर्भात माहिती देताना सुनील फुलारी म्हणाले की, इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांची चौकशी सुरू होती. याच दरम्यान आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या तरूणांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली होती. यानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या सुमारे दीडशे तरूणांनी जमाव जमवून दुचाकी, चारचाकी वाहने पेटवून दिली. पहिल्या समूहातील तरूणांना मारहाण करून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड देखील केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बाळाचा वापर करून जमावास पांगवण्यात यश मिळवलं. दंगलीत झालेल्या मारहाणीमध्ये एकूण १० जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चांगली आहे. एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं आयजी सुनील फुलारी यांनी सांगितलंय.



जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता : रविवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद (Internet service Down in Satara) केल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आलाय. या परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांवना सुट्टी देण्यात आलीय. सध्या संवेदनशील शहरांमध्ये बंदोबस्त तैनात असून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलीय. जिल्ह्यात मात्र तणावपूर्ण शांतता आहे.

हेही वाचा :

  1. Riots in Satara : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
  2. Dhule Riot : आदिवासी दिनाचे बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटात दंगल, आमदारांच्या गाडीसह 8 वाहने फोडली
  3. Nitesh Rane on Kolhapur Riot : दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात त्यांची नार्को टेस्ट करा सत्य बाहेर येईल : आमदार नितेश राणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.